loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यावर अवकाळीचे संकट! मुंबई-कोकणाला पावसाचा इशारा ,

मुंबई. : राज्यातील हवामानात सध्या मोठे बदल होताना दिसत आहेत. कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मुंबईच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात वाढ झाल्याचं चित्र असून, त्यामुळे मागील काही दिवसांपासून जाणवणारा गारठा काही अंशी कमी झाला आहे. पहाटेच्या वेळी जाणवणारी बोचरी थंडी कमी होत असली तरी, राज्याचा पूर्व आणि उत्तर भाग मात्र अजूनही थंडीच्या प्रभावाखाली आहे.हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम असून, ही परिस्थिती पुढील 24 ते 48 तास तशीच राहण्याची शक्यता आहे. नागपूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, अकोला, जळगाव, नंदुरबार, धुळे आदी भागांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदवलं जात असून, पहाटेच्या वेळेत गार वारे आणि धुके यामुळे नागरिकांना तीव्र थंडीचा सामना करावा लागत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दुसरीकडे, कोकण पट्टा, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागांत किमान तापमानात वाढ झाल्यामुळे थंडीची तीव्रता कमी झाली आहे. दिवसा उन्हाचा चटका वाढत असून, सकाळ-संध्याकाळ सौम्य गारठा जाणवत आहे. या बदलामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळत असला तरी, हवामानातील चढउतारांमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता डॉक्टरांकडून व्यक्त केली जात आहे.

टाइम्स स्पेशल

किनारपट्टी भागांमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता असून, त्यामुळे जानेवारी महिन्यात पावसाळ्यासारखी परिस्थिती अनुभवावी लागू शकते, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषतः कोकण किनारपट्टी, मुंबई महानगर प्रदेश आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही.हिवाळ्यात होणाऱ्या या संभाव्य पावसामुळे शेतीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. काढणीला आलेली पिकं, भाजीपाला आणि फळबागांना याचा फटका बसू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला कृषी व हवामान तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

किनारपट्टी भागांमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg