loader
Breaking News
Breaking News
Foto

पाचल येथे श्री राम सेवक मंडळाच्या वतीने भव्य ध्वजस्तंभाचे अनावरण

तुषार पाचलकर (राजापूर) - राजापूर तालुक्यातील पाचल बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्री राम सेवक मंडळ, पाचल यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या भव्य ध्वजस्तंभाचे अनावरण मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर उत्साहात पार पडले. या सोहळ्यामुळे परिसरात आनंद, उत्साह आणि सामाजिक एकतेचे वातावरण निर्माण झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अनावरणाच्या वेळी भगवा ध्वज फडकताच उपस्थित नागरिकांनी जयघोष करत आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाला गावातील मान्यवर नागरिक, युवक, ज्येष्ठ मंडळी तसेच श्री राम सेवक मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

ध्वजस्तंभ उभारणीमागे सामाजिक एकोपा वृद्धिंगत करणे, सांस्कृतिक मूल्यांचे जतन करणे आणि राष्ट्रप्रेमाची भावना जागवणे हा उद्देश असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. या उपक्रमासाठी ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. ध्वजस्तंभ उभारल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसराला नवे, प्रेरणादायी आणि ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg