loader
Breaking News
Breaking News
Foto

घारपी शाळेत राष्ट्रनिर्मात्यांना अभिवादन: विद्यार्थ्यांनी घेतला विवेकानंद–जिजाऊंच्या विचारांचा वारसा

बांदा (प्रतिनिधी) - घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रीय युवक दिन व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त थोर राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांना अत्यंत भक्तिभावाने अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात प्रेरणादायी विचार व प्रार्थनेने झाली. विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. यावेळी शिक्षकांनी स्वामी विवेकानंद यांचा उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका. हा संदेश विद्यार्थ्यांना समजावून सांगत त्याचे आजच्या काळातील महत्त्व स्पष्ट केले. तसेच राजमाता जिजाऊ यांचे आदर्श मातृत्व, दूरदृष्टी आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर घडवलेले संस्कार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांनी भाषणे व विचारमांडणीद्वारे या थोर व्यक्तिमत्त्वांच्या जीवनकार्याची माहिती सादर केली. त्यांच्या विचारांतून मिळणारी प्रेरणा आजच्या पिढीसाठी किती आवश्यक आहे, यावर प्रकाश टाकण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, चारित्र्य, देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि नैतिक मूल्यांची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक जे. डी. पाटील यांच्यासह सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, मुरलीधर उमरे, धर्मराज खंडागळे, अंगणवाडी सेविका संजना गावकर व पालक सागर गावडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg