loader
Breaking News
Breaking News
Foto

निगुडे नळ पाणीपुरवठा योजनेत धक्कादायक प्रकार; पाईपलाईनमध्ये मेलेली पाल आढळून खळबळ

बांदा (प्रतिनिधी) - निगुडे गावातील ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनेतून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात रविवारी सकाळी धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सकाळी सुमारे ८.३० वा. जाधववाडी परिसरात नळाला पाणी येत नसल्याने तसेच कमी दाबाने पाणी येत असल्याने मडुरा सोसायटी संचालक पुंडलिक जाधव यांनी माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य समीर गावडे यांना याची माहिती दिली. यानंतर नळकामगार परेश गावडे यांना पाईपलाईन तपासण्यास सांगण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तपासणीदरम्यान पाणीपुरवठ्याच्या मीटरजवळील जाळीमध्ये चक्क मेलेली पाल आढळून आली. हा प्रकार समोर येताच गावात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांना माहिती मिळताच पिण्यासाठी साठवलेले पाणी तत्काळ बाहेर फेकण्यात आले. याबाबत समीर गावडे यांनी सांगितले की, गावातील नळ पाणीपुरवठा योजनेतील अतिरिक्त पाणी बाहेर टाकण्यासाठी ठिकठिकाणी फ्लशआऊट बसवले असले तरी त्यांची नियमित साफसफाई केली जात नाही. तसेच पाण्यात टीसीएल पावडर टाकली जात नाही व पाण्याच्या टाक्यांची स्वच्छताही होत नसल्याने असे प्रकार घडत आहेत.

टाईम्स स्पेशल

या प्रकरणाची माहिती ग्रामसेवक व आरोग्य सेवकांना देण्यात आली असून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, नागरिकांनी खबरदारी म्हणून पाणी उकळूनच प्यावे, असे आवाहनही समीर गावडे यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg