loader
Breaking News
Breaking News
Foto

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत आबलोली ग्रामपंचायतीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली या ग्रामपंचायतीच्या वतीने आबलोली गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गुहागर तालुक्यामधील सर्वात प्रथम नाविन्यपूर्ण उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ आबलोली गावात करण्यात आला आहे. निर्मल ग्रामपंचायत आबलोली या ग्रामपंचायतच्या वतीने गावातील सर्व समाज घटकांना एकत्रित करून प्लास्टिक बंदी वर प्रभावीपणे उपाययोजना करण्याकरता कापडी पिशवी वेडिंग मशीन आबलोली गावात मुख्य बाजारपेठेत बसवण्यात आली असून या मशीन मध्ये १०/- रुपयांचा कॉइन टाकल्यानंतर कापडी पिशवी बाहेर येते. त्यामुळे ग्रामस्थांसह ,ग्राहकांना कापडी पिशवी वापराची सवय होईल आणि प्लास्टिक बंदीला कापडी पिशवीचा पर्याय राहील. आणि निसर्गाचे संरक्षण देखील होईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच ओला कचरा (टाकाऊ पदार्थांपासून) डीकंपोज खत निर्मिती करणारी डीकंपोज खत निर्मिती मशीनहि आबलोली गावात बसवण्यात आलेले आहे. तसेच महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटरी पॅड/नॅपकिन वेडिंग मशीन सार्वजनिक ठिकाणी बसवण्यात आलेली आहे. निर्मल ग्रामपंचायत आबलोली सरपंच वैष्णवी नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, उपसरपंच अक्षय पागडे यांचेसह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांना एकत्र घेऊन आबलोली गावात लोकसहभागातून लोक चळवळ उभी करून विकास कामांबरोबरच आरोग्य विषयक विविध कामे मार्गी लागत आहेत. तसेच १५ वित्त आयोगामधूनही आबलोली गावात विकास कामे होत आहेत. यामध्ये ग्रामस्थ महिला पुरुष आणि युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg