loader
Breaking News
Breaking News
Foto

न्यू मांडवे प्रकल्पाबाबत नितीन जाधव यांच्या आत्मदहन निर्णयावर ग्रामस्थांची सभा

खेड - न्यू मांडवे अपूर्ण प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न करणारे भूमिपुत्र नितीन सखाराम जाधव यांनी शासनाला पत्राद्वारे आत्मदहनाचा अंतिम निर्णय कळवला आहे. जाधव यांनी असा निर्णय घेऊ नये यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असतानाही, ग्रामस्थ भूमिपुत्र म्हणून त्यांच्या या टोकाच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी सर्वोतापरी प्रयत्न करण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यासाठी सभेचे नियोजन करण्यात आले होते. रविवार, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी मुंबईकर भूमिपुत्र ग्रामस्थांची जाहीर सभा घेण्यात आली. या सभेचे नेतृत्व स्थानिक भूमिपुत्र रविंद्र निकम, सुधाकर कदम आणि अशोक शेलार यांनी केले. या सभेत नितीन जाधव यानी घेतलेल्या आत्मदहनाचा निर्णय स्थगित करण्यासाठी आपल्याला संघटित होऊन एकत्रित सर्वोतपरी प्रयत्न करण्याचे आवाहन करून सभेची सुरुवात केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तद्नंतर नितीन जाधव यांनीं स्वतः आपण शासनाकडे केलेला अनेक वर्षापासूनचा पाठपुरावा आणि त्यावर शासनाची आलेली उत्तरे यांचे वाचन केले, न्यू मांडवे धरण प्रकल्प तब्बल ३२ वर्ष दुर्लक्षित आहे, शासनाची नकारात्मकता पाहून नाईलाजाने मला २६ जानेवारी २०२६ रोजी आत्मदहनाचा निर्णय घ्यावा लागला आणि मी त्या मतावर ठाम आहे असे नितीन जाधव यांनी उपस्थित मुंबईकरांना स्पष्ट केले. सभेला उपस्थित प्रकल्पग्रस्त बहुसंख्य मुंबईकरांनी जाधव यांच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी सकारात्मक सखोल चर्चा केली. यात सिताराम कदम (तळे, चिंचवाडी), संभाजी शेलार सुभाष कदम (दहिवली), एकनाथ निकम (किंजळे तर्फे नातू) यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आणि पुढाकार घेऊन आपली मते मांडली, सर्वानुमते पुढील निर्णय घेण्यात आले. १) न्यू मांडवे धरण प्रकल्प पूर्ण करण्यात स्थानिक आमदार योगेश कदम यांची महत्त्वाची भूमिका असणे गरजेचे आहे, त्यांची भेट घेऊन तातडीने या प्रकल्पाची फाईल जी वित्त मंत्रालयकडे आहे, तिला कॅबिनेट मध्ये मंजुरी मिळण्यासाठी आग्रही विनंती करणे.

टाइम्स स्पेशल

तद्नंतर खासदार तटकरे यांची भेट घेऊन त्यांनाही सदर दुर्लक्षित प्रकल्पाची माहिती देऊन त्यासकडून शासनाकडे हा त्वरित चालू कार्यासाठी प्रयत्न करण्यासाठी विनंती करणे. २६ जानेवारी २०२६ च्या अगोदर जर शासनाने यावर सकारात्मक तोडगा काढला नाही, तर सदर दिवशी प्रकल्पग्रस्त आणि अष्टक्रोशीतील स्थानिक आणि मुंबईकर यांनी संघटित होऊन नितीन जाधव यांना आत्मदहन करण्यापासून परावृत्त करण्यासाठी समज देणे, व त्याच ठिकाणी भविष्यातील न्यू मांडवे प्रकल्पासाठी मोठी चळवळ उभारणे. अशा प्रकारे ग्रामस्थांनी ठरवले की, आमदार किंवा खासदार यांच्याकडे चर्चा करून आवश्यक ते सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, कोणत्याही परिस्थितीत नितीन जाधव यांना एकटे सोडले जाणार नाही, असे ठाम मत सभेत व्यक्त झाले. वरील निर्णय झाल्यानंतर जाधव यांनी स्पष्ट केले की, “माझा निर्णय मी शासनाला कळवलेला आहे. आता वेळ कमी आहे, त्यामुळे मी माघार घेऊ शकत नाही. तुम्ही करत असलेल्या प्रयत्नाबद्दल मी आभारी आहे, पण मी माझ्या निर्णयावर कायम ठाम राहणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

आत्मदहन आंदोलन होणारच

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg