loader
Breaking News
Breaking News
Foto

फुरूस-भुलेश्वरवाडीतील सचिन पाटील मुंबई मनपात नगरसेवक, खेड तालुक्यात आनंदोत्सव!

खेड : तालुक्यातील फुरूस-भुलेश्वरवाडीतील रहिवासी आणि कांदिवली येथे राहणारे उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार सचिन बाळकृष्ण पाटील हे मुंबई महानगरपालिकेच्या कांदिवली - पूर्व प्रभाग क्र. २९ मधून भाजपा उमेदवाराचा पराभव करून १९३८ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांच्या या दणदणीत विजयामुळे फुरूस - भुलेश्वरवाडीसह खेड तालुक्यातील विविध भागात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व पाठिंब्याबद्दल त्यांनी वॉर्डातील सर्व आबालवृद्ध, माता-भगिनी आणि तरुण सहकार्‍यांचे मनापासून आभार मानले आहेत. मतदारांनी विश्वास दाखवून जी मोठी जबाबदारी सोपवली आहे, तिला मी कधीही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. हा विजय म्हणजे केवळ राजकीय यश नसून आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी दिलेली एकजूट आहे. आता प्रत्यक्ष कामाची वेळ असून प्रभागाचा कायापालट करण्यासाठी मी सदैव जनतेच्या सेवेत तत्पर राहीन, असा ठाम विश्वास सचिन पाटील यांनी व्यक्त केला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg