loader
Breaking News
Breaking News
Foto

बांदा शहराच्या प्रभारी सरपंचपदी आबा धारगळकर

बांदा (प्रतिनिधी) - बांदा शहर ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी उपसरपंच राजाराम उर्फ आबा धारगळकर यांनी कार्यभार स्वीकारला आहे. विद्यमान सरपंच प्रियांका नाईक या वैयक्तिक कारणास्तव सुट्टीवर गेल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत प्रभारी सरपंच म्हणून धारगळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रभारी सरपंचपदाचा कार्यभार स्वीकारताच धारगळकर यांचे भाजपच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. शहरातील विकासकामे, नागरी समस्या तसेच ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज सुरळीतपणे पार पाडण्याची जबाबदारी ते समर्थपणे सांभाळतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. धारगळकर हे प्रभाग क्रमांक १ चे प्रतिनिधित्व करतात. त्यांची जानेवारी २०२५ मध्ये पक्षीय धोरणानुसार उपसरपंचपदी निवड झाली होती.

टाईम्स स्पेशल

धारगळकर यांच्या नियुक्तीमुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजात सातत्य राहील तसेच सुरू असलेल्या व प्रस्तावित विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg