loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी लांजाच्या स्मिता दळवी बिनविरोध

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी लांजाच्या स्मिता अनिल दळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दळवी या सहकार क्षेत्रात गेली वीस वर्षे काम करीत आहेत. त्या लांजा विकास सोसायटीच्या पंधरा वर्षे संचालिका आहेत. तसेच जिल्हा सहकार बोर्डावर त्या संचालिका आहेत. बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब महिलांना एकत्र करून त्यांना उद्योग धंद्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सहकार क्षेत्राची त्यांना विशेष आवड आहे. सहकारातून गोरगरिबांना उभे करता येईल अशी त्यांची ठाम धारणा आहे. लांजात सहकारातून एखादा कारखाना उभा रहावा व त्यातून लोकांना रोजगार मिळावा अशी तळमळ त्यांनी व्यक्त केली. त्या महिलांना संघटित करण्याचे काम करीत असतात. त्या ग्रुप ग्रामपंचायत झापडे कांटेच्या उप सरपंच होत्या. त्यांच्या निवडीबद्दल तालुक्यातून अभिनंदन करण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg