loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडात सार्वजनिक रस्त्यावर पाद‌चारी व वाह‌नांना अडथळा निर्माण करणाऱ्यावर गुन्हा दाखल !

खेड - शहरातील सार्वजनिक रस्त्यावर पादचारी व वाहनांना अडथळा निर्माण करणाऱ्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील आयसीआयसीआय बँकेसमोर दि. १५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ११:४५ वाजण्याच्या सुमारास मुनुर दाऊद ऐनेकर (वय-७०, रा. आयशा कॉम्प्लेक्स, दापोली नगरपरिषद् समोर. दापोली, जि. रत्नागिरी) या संशयित आरोपीने स्वतःच्या ताब्यातील लाल रंगाची मारुती सुझुकी कंपनीची विटारा ब्रिझा क्रमांक एम. एच. ३०/ए. टी. २६२९ हि गाडी रस्त्याच्या मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना तसेच सार्वजनिक रस्त्याने येणाऱ्या पाद‌चाऱ्यांना धोका निर्माण होईल, अशा स्थितीत उभी करून कोठेतरी निघून गेला होता म्हणून खेड पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस शिपाई तेजस्विनी उमेश जाधव यांनी फिर्याद दिल्यानुसार संशयित आरोपी मुनुर दाऊद ऐनेकर याच्याविरोधात गुन्हा रजि. नं. ०७/२०२६, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg