loader
Breaking News
Breaking News
Foto

महानगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर मोहोर; मंत्री उदय सामंत यांनी मानले मतदारांचे आभार

रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले. शिवसेनेतील उठावानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्वांचे लक्ष या निकालांकडे लागले होते. या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत ’महायुती’ला मोठे यश मिळवून दिल्याचे सामंत यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उदय सामंत म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचे सुमारे सव्वा चारशेहून अधिक नगरसेवक निवडून आले आहेत. मुंबईत शून्यावरून थेट २९ जागा जिंकणे, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीवर पूर्ण वर्चस्व मिळवणे, हा शिंदे साहेबांच्या लोकप्रियतेचा विजय आहे. विशेषतः ज्या शहरांमध्ये पक्षाचे अस्तित्व नव्हते, अशा पिंपरी-चिंचवडमध्ये सहा, तर नागपूर, चंद्रपूर आणि अकोला यांसारख्या शहरांतही पक्षाचे नगरसेवक स्वबळावर निवडून आले आहेत. नवी मुंबईत पक्षाने ४० चा आकडा पार केला असून, सांगली-मिरज-कुपवाडमध्ये तर महापौर ठरवण्याची ताकद शिवसेनेने निर्माण केली असल्याचे त्यांनी नमूद केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg