loader
Breaking News
Breaking News
Foto

यंदा शेतक-यांच्या भाताला २ हजार ३६९ रूपये क्विंटल दर !

खेड (वार्ताहर) : - यंदा शेतक-यांच्या भाताला २३६९ रूपये क्विंटल दर निश्चित करण्यात आला असुन तालुक्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी केले आहे. यावेळी शेतकर्‍यांच्या आर्थिक उत्कर्षासाठी कटीबध्द असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे. तालुक्यातील वेरळ येथील संघाच्या गोदामात खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ भात खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. संघाचे अध्यक्ष बाबाजीराव जाधव व उपाध्यक्ष श अरविंद आंब्रे तसेच संचालक व व्यवस्थापक सचिन कुळे यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ते म्हणाले, संघामार्फत शेतकर्‍यांची आर्थिक प्रगती साधण्यावर भर दिला जात आहे. यंदाही शेतकर्‍यांकडून भात खरेदी केला जाणार असुन योग्य तो दर देण्यात आला आहे. या खरेदी साठी खरीप सन २०२५-२६ पिक पेरा नोंद असलेल्या सातबारा, आधारकार्ड, बैंक पासबुक झेरॉक्स आवश्यक आहे. भाताची रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खाते मध्ये मार्केटिंग फेडरेशन मार्फत जमा होणार आहे तसेच याप्रसंगी शेतकर्‍याच्या आलेल्या अडचणी पिक पेरा नोंदणीसाठी येथील उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधुन येणा-या अडचणीवर याबाबत चर्चा केली. याप्रसंगी संघाचे संचालक विष्णू मोरे, शेखर दळवी, शामराव मोरे, प्रकाश कडू, प्रफुल्ल मोरे, सुजित भुवड, अंकुश कदम, विश्वास सुर्वे, सौ. उज्वला कदम, अकौंटंट तुषार कारंजकर तसेच माजी सभापती विजयराव कदम व शेतकरी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg