loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणात साहित्यिक वैशाली पंडित यांच्या 'आगीनझाड' कथासंग्रहाचा रौप्य महोत्सव उत्साहात

मालवण (प्रतिनिधी) - साहित्यिक वैशाली पंडित यांचे लेखन हे कोणत्याही लेखकाच्या अनुकरणाशिवाय असलेली प्रतिभा आहे, असे प्रतिपादन कोमसापचे केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांनी येथे बोलताना केले. मालवण येथील बॅ नाथ पै सेवांगण येथे 'आगिनझाडची पंचविशी' हा विशेष सोहळा संपन्न झाला. मालवणच्या ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित लिखित 'आगीनझाड' ह्या कथासंग्रहाला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने विशेष 'रौप्यपर्व पूर्ती सोहळा' आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर बॅ. नाथ पै सेवांगण मालवणचे कार्याध्यक्ष श्री. किशोर शिरोडकर व कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित व साने गुरुजी वाचन मंदिर कार्याध्यक्ष डॉ. ज्योती तोरसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष तसेच कोमसाप केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांनी कथा कशी असावी, कथेचे मर्म आणि पुढील लेखनाच्या दिशा यावर भाष्य केले. प्रारंभी लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी प्रास्ताविक केले. ॲड. अपर्णा प्रभू परांजपे यांनी 'आगीनझाड' या कथेचे प्रभावी अभिवाचन केले. 'आगीनझाड' पुस्तकावर आयोजित करण्यात आलेल्या विशेष परिसंवादामध्ये अनुवादिका वंदना करंबेळकर, ॲड. अपर्णा प्रभू परांजपे, अभिनेता अभय खडपकर व कोमसाप अध्यक्ष नमिता कीर कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर हे सहभागी झाले होते. लेखिका वैशाली पंडित यांना नमिता कीर व किशोर शिरोडकर यांच्या हस्ते विशेष मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी डॉ. ज्योती बुवा तोरसकर यांनी लेखिका वैशाली पंडित यांची मुलाखत घेतली. आभार डॉ. गौरी गणपत्ये यांनी मानले. कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg