loader
Breaking News
Breaking News
Foto

वरवेली प्रीमियर लीग स्पर्धेचा विजेता सिद्धिविनायक तर रुद्र–मीरा फायटर्स उपविजेता

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील वरवेली प्रीमियर लीग २०२६ (पर्व ८ वे) क्रिकेट स्पर्धेचा विजेता कुणाल देसाई यांचा सिद्धिविनायक , मराठवाडी संघ ठरला असून जगन्नाथ शिंदे व तेजस शिंदे यांचा रुद्र – मीरा फायटर्स उपविजेता ठरला आहे. वरवेली प्रीमियर लीगच्या क्रिकेट स्पर्धा श्री हसलाई देवी मंदिर वरवेली खालचीवाडी शेजारी कोंडवी येथील मैदानावर पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन वरवेली ग्रामपंचायत सरपंच नारायण आगरे, महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये १२ संघ व १५६ खेळाडू सहभागी झाले होते. तृतीय क्रमांक शशांक शिंदे / अनिरुध्द अवेरे यांचा शंभूराजे फायटर्स तर चतुर्थ क्रमांक विलास किर्वे यांचा शिवशक्ती संघाने प्राप्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मालिकावीर अविनाश शिंदे, उत्कृष्ट फलंदाज अविनाश शिंदे, उत्कृष्ट गोलंदाज संदेश आग्रे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चिराग विचारे, उगवता तारा राज शिंदे यांनाही रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमाला तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अनिल रांजाणे,वरवेली प्रीमियर लीगचे अध्यक्ष अनिल अवेरे , उपाध्यक्ष शांताराम शिंदे, सचिव सलील सुर्वे, अमोल पवार, नयन चांदोरकर, पंकज आगरे, प्रमोद आगरे, हरिश्चंद्र अवेरे, जितेंद्र अवेरे, अंकेश गुरव, प्रसाद विचारे, सुशांत गावडे, पत्रकार गणेश किर्वे , ग्रामपंचायत सदस्य संदीप पवार, शैलेश नारकर, वैभव पवार, राजेंद्र विचारे , शेखर विचारे, विलास विचारे, आशिष विचारे , प्रल्हाद विचारे, जितेंद्र विचारे, अक्षय देवरुखकर, विलास किर्वे, समीर महाडिक, अमित मोरे, सुहास अवेरे, अमित मोरे, पोलीस पाटील सुजित शिंदे, अरुण भुवड, सुनील शिंदे, रणजित शिंदे इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg