loader
Breaking News
Breaking News
Foto

देवरूखच्या उपनगराध्यक्षपदी वैभव पवार बिनविरोध

देवरूख (सुरेश सप्रे) - देवरूख नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्षपदासाठी महा आघाडीतील मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटाचे वैभव पवार यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच स्विकृत नगरसेवक म्हणून महायुतीकडून भाजपाचे रुपेश भागवत तर राष्ट्रवादी आघाडीकडून मनसेचे शहराध्यक्ष सागर संसारे यांची निवड झाली. पालिकेच्या छ.शिवाजी महाराज सभागृहामध्ये झालेल्या या पहिल्या सभेमध्ये उपनराध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीकडून शिवसेनेचे वैभव पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, विरोधी पक्षांकडून उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे पवार यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निवडणूकीत महायुतीने वर्चस्व राखले आहे. तर, थेट लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून भाजपाच्या मृणाल शेट्ये निवडून आल्या होत्या. निवडणुकीनंतर देवरूख नगर पालिकेची पहिली सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष मृणाल शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले, कार्यालयीन अधीक्षक राणे यांसह सर्व नगरसेवक उपस्थित होते. त्यानंतर, दोन जागांवरील स्विकृत नगरसेवकांचीही यावेळी निवड करण्यात आली. त्यामध्ये सत्ताधारी महायुतीच्या गटाकडून भाजपाचे रूपेश भागवत यांच्या नावाची शिफारस करण्यात आलेली होती. तर राष्ट्रवादीच्या गटाकडून मनसेच्या सागर संसारे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. त्याप्रमाणे भागवत व संसारे यांची स्विकृत नगरसेवक म्हणून निवड झाली.

टाईम्स स्पेशल

नूतन उपनगराध्यक्ष वैभव पवार स्वीकृत नगरसेवक रुपेश भागवत व सागर संसारे यांचे नगराध्यक्ष मृणाल शेट्ये यांच्यासह सर्व नगरसेवकांनी अभिनंदन केले. उपनगराध्यक्ष पदावर विराजमान झालेवर वैभव पवार यांनी आपण सर्व सदस्यांनी एकसंघपणे काम करून देवरूख शहराच्या विकासासाठी प्रयत्न करू या असे आवाहन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg