loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली तालुका शिवसेना आयोजित मोफत तपासणी शिबीराला उस्फूर्त प्रतिसाद

खेड (प्रतिनिधी) - भक्त श्रेष्ठ कमलाकर पंत रुग्णालय डेरवण आणि शिवसेना तालुका दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे मोफत शस्त्रक्रिया नोंदणी तपासणी शिबिर आणि "मधुसागर प्रकल्प" अंतर्गत मधुमेही रुग्णाच्या मोफत तपासणी शिबीराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. हृदयविकार, युरोपातही, अस्थिरोग, कॅन्सर शस्त्रक्रिया, डोळ्याच्या शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, कान, नाक, घसा, जनरल सर्जरी आदी रुग्णाचे शस्त्रक्रिया पुर्व नोंदणी तपासणी शिबीर तसेच मधुमेही रुग्णाची मोफत तपासणी या शिबीरात डेरवण रुग्णालयाचे डाॅ.शुभम गुत्ता, डाॅ.रसिका सिरसाट, डाॅ.संतनु दास, डाॅ.प्रणाली चौगुले, डाॅ.धामणकर आणि त्यांच्या सहकारी टीम कडुन करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिवसेना दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई, माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, नगराध्यक्षा कृपा घाग, महीला तालुका संघटक दित्पी निखार्गे, को कृ विद्यापीठ सिनेट सदस्य सुनिल दळवी, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पेठकर, नगरसेविका रिया सावंत, आश्विनी लांजेकर, नौसिन गिलगिले, उपशहरप्रमुख प्रितम शिन्दे, मंदार केळकर, अशोक माने, नदीम मुकादम, उंबर्ले सरपंच नरेंद्र मांडवकर, माजी सरपंच रामचंद्र पांगत, शाखाप्रमुख महादेव शेडगे, मिनाज महाते, संदीप देसाई, शिबिराचे नियोजन करणारे आणि डेरवण रुग्णालयात कोणत्याही रुग्णाना मदत करण्यास तत्पर असलेले आरोग्य मित्र सचिन धुमाळ आदी मान्यवर शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

गरजु रुग्णाना या तपासणी शिबिराचा खूप फायदा होणार, शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. डेरवण रुग्णालयाने शिबिरासाठी केलेल्या सहकार्याबद्दल दापोली तालुका शिवसेना परिवाराकडून डेरवण रुग्णालयाचे आभार व्यक्त करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg