loader
Breaking News
Breaking News
Foto

ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला पोलीस स्टेशनचा कारभार

मालवण (प्रतिनिधी) - पोलीस रेझिंग डे सप्ताहाच्या निमित्ताने कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिर या प्रशालेने मालवण पोलीस स्टेशनला भेट दिली. या क्षेत्रभेटीत विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनच्या कामकाजाचा जवळून अनुभव घेत विविध माहितीही घेतली. पोलिस स्थापना दिन म्हणजेच रेझिंग डे निमित्त मालवण पोलीस स्टेशनच्यावतीने पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहाच्या निमित्ताने पोलीस स्टेशनच्यावतीने पोलीस खात्यातील विविध शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन व मार्गदर्शन, घातक पदार्थ व बॉम्ब शोध यंत्रांचे प्रदर्शन व मार्गदर्शन, पोलीस स्टेशन व्यवस्थापन व कारभाराचे मार्गदर्शन, पोलीस बँड पथकाचे वादन इत्यादी उपक्रमांचे व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस स्टेशनच्या या उपक्रमांची ओळख व माहिती मिळावी याकरिता मालवण पोलीस स्टेशनच्यावतीने ओझर विद्यामंदिर कांदळगाव या ग्रामीण भागातील प्रशालेला खास निमंत्रित केले होते. या क्षेत्रभेटीमध्ये ओझर विद्यामंदिर प्रशालेचे ४८ विद्यार्थी व त्यांच्या समवेत ज्येष्ठ शिक्षक ए. ए. शेर्लेकर, एस. जे. सावंत व प्रभारी मुख्याध्यापक सहभागी झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मालवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भोसले यांनी विद्यार्थ्यांना पोलीस निरीक्षक कक्ष, ठाणे अंमलदार व बिनतारी संदेश कक्ष, अधिकारी कक्ष, बारनिशी व कारकून कक्ष, ट्रेझरी आणि पोलीस कोठडी तसेच, गोपनीय आणि गुन्हे संकलन गुन्हे अन्वेषण इत्यादी विभागाच्या कामकाजाविषयी माहिती दिली. पोलीस दलाच्या आधुनिक शस्त्रास्त्रांविषयी पोलीस हवालदार सुधीर लोंढे व बॉम्बशोधक यंत्रांविषयी पोलीस हवालदार संजय शिरटीकर यांनी विद्यार्थ्यांना माहिती देताना विद्यार्थ्यांना सामाजिक सुरक्षा, सजगता व सामाजिक शांततेबद्दलच्या कर्तव्यांची जाणीव करून दिली.

टाइम्स स्पेशल

या कार्यक्रमप्रसंगी मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस उपनिरीक्षक भोसले, बॉम्बशोधक नाशक पथकाचे पोलीस हवालदार संजय शिरटीकर, शस्त्र प्रशिक्षक पोलीस हवालदार सुधीर लोंढे, पाटील, महिला पोलीस हवालदार सुप्रिया पवार, भरोसा सेल सिंधुदुर्ग ओरोसच्या महिला पोलीस हवालदार साक्षी खोपकर, डायल ११२ सिंधुदुर्ग ओरोसच्या पोलीस हवालदार रागिणी पालकर, पोलीस बँड विभाग सिंधुदुर्गचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोन्साल्विस आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल ओझर विद्यामंदिरच्या प्रभारी मुख्याध्यापकांनी मालवण पोलीस स्टेशनचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस हवालदार सुशांत पवार यांनी केले. तर आभार पोलीस उपनिरीक्षक भोसले यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg