loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लबच्या उपक्रमातून आनंद मठातील विद्यार्थ्यांची संक्रांत गोड, उबदार भेटवस्तू आणि खाद्य पदार्थांचे वाटप

खेड (प्रतिनिधी) - मकर संक्रांतीच्या शुभदिनाचे औचित्य साधून लायन्स क्लबच्यावतीने खेड-खोपी येथील कार्ड सिद्धेश्वर महाराज संचलित आनंद मठातील विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबवण्यात आला. संक्रांत म्हटली की तोंड गोड करण्याची परंपरा.. आणि हीच गोडी मठातील मुलांच्या चेहर्‍यावरही आणावी या हेतूने लक्ष्मी सेल्सचे मालक बाबुभाई सुंदेशा यांच्या सौजन्याने विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात मुलांना उबदार ब्लॅकेट्स, धान्य, फळे, लाडू आणि चॉकलेटचे वितरण करण्यात आले. संक्रांतीसारख्या सणावाराच्या दिवशी अशा प्रकारची मदत मिळाल्याने मुलांच्या आनंदात भर पडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे, आनंद मठाचे प्रमुख डॉ. विवेक मोरे तसेच बाबुभाई सुंदेशा आणि त्यांची मुले उपस्थित होती. सर्वांनी मुलांशी संवाद साधत त्यांच्यासोबत संक्रांताचा आनंद वाटला. या उपक्रमामुळे सामाजिक जाणिवेला चालना मिळते तसेच सणांच्या निमित्ताने वंचित घटकांपर्यंत आनंद पोहोचवण्याचे कार्य अधिक बळकट होते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. मुलांसोबत संक्रांत साजरी करण्यासाठी वेळ दिल्याबद्दल डॉ. विवेक मोरे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. लायन्स क्लब आणि लक्ष्मी सेल्सच्या संयुक्त उपक्रमामुळे आनंद मठातील विद्यार्थ्यांची संक्रांत खर्‍या अर्थाने गोड झाली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg