loader
Breaking News
Breaking News
Foto

आयुर्वेद संशोधक सुमेध जोशी भारत–जपान आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक स्पर्धेत प्रथम

मालवण (प्रतिनिधी) - भारत व जपानमधील आघाडीच्या शास्त्रज्ञ आणि तरुण संशोधकांचा सहभाग असलेल्या भारत–जपान आंतरराष्ट्रीय CAFE-PLUS 2025 (Presentation Learning for Young Scholars) या प्रतिष्ठित वैज्ञानिक स्पर्धेत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA), नवी दिल्ली येथील BAMS, MD आणि PhD (शोधार्थी) असलेले सुमेध जोशी यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. सुमेधा हा मालवण येथील रहिवासी आहे. रोख बक्षिस आणि प्रशस्तीपत्रक असे पारितोषिक स्वरूप आहे. संजय जोशी आणि मेघना जोशी यांचा तो मुलगा आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा जपानच्या AIST (National Institute of Advanced Industrial Science and Technology) आणि भारतातील DAILAB (Diverse Assets & Applications International Laboratory) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमात प्रामुख्याने भारत व जपानमधील वैज्ञानिक, संशोधक आणि उच्च शिक्षण संस्थांतील अभ्यासक सहभागी झाले होते, ज्यामुळे या स्पर्धेला द्विदेशीय आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. CAFE-PLUS 2025 ही स्पर्धा चार टप्प्यांत पार पडली. जुलै 2025 मध्ये झालेल्या पहिल्या फेरीत निवडलेल्या 29 संशोधकांमधून पुढील टप्प्यांत कठोर मूल्यमापन करण्यात आले. सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या पुढील फेऱ्यांनंतर केवळ चार स्पर्धक अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. 13 जानेवारी 2026 रोजी झालेल्या अंतिम फेरीत सुमेध जोशी यांनी आयुर्वेदिक वैद्यकशास्त्र, आधुनिक वैज्ञानिक पद्धती आणि प्रभावी संशोधन सादरीकरण यांचा समन्वय साधत आपले संशोधन मांडले. पारंपरिक भारतीय ज्ञानप्रणालीचा आधुनिक विज्ञानाशी शास्त्रीय पातळीवर केलेला समन्वय, तसेच जागतिक आरोग्य क्षेत्रासाठी त्याची उपयुक्तता, यामुळे आंतरराष्ट्रीय परीक्षक समितीने त्यांच्या कामाची विशेष दखल घेतली. या स्पर्धेत आयआयटी गुवाहाटी येथील मुकेश कुमार यांनी द्वितीय, तर भरतवाज एन यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

टाइम्स स्पेशल

या उल्लेखनीय यशामागे AIIA चे निदेशक, अधिष्ठाता (Dean) तसेच संबंधित विभागातील प्राध्यापक व मार्गदर्शकांचे संस्थात्मक पाठबळ महत्त्वपूर्ण ठरले. तसेच, IIT गुवाहाटी येथील Postdoctoral Fellow असलेल्या Dr. Mangala Hegde, M.Sc., Ph.D. (SERB-NPDF) यांच्या वैज्ञानिक मार्गदर्शनामुळे संशोधनाच्या सादरीकरणात शास्त्रीय स्पष्टता व आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होण्यास मोलाची मदत झाली, असे नमूद करण्यात आले. सुमेध जोशी हे प्रशिक्षित आयुर्वेद चिकित्सक (BAMS), पदव्युत्तर आयुर्वेद संशोधक (MD) असून सध्या PhD संशोधनात कार्यरत आहेत. त्यांच्या या यशामुळे आयुर्वेदिक संशोधनाची जागतिक स्तरावरील विश्वासार्हता अधोरेखित झाली असून, भारत–जपान वैज्ञानिक सहकार्याच्या दृष्टीने ही कामगिरी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg