loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री देव दांडेश्वराचा जत्रोत्सव उत्साहात संपन्न

मालवण (प्रतिनिधी) - मालवण दांडी येथील श्री देव दांडेश्वर मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. भाविकांच्या गर्दीने दांडी किनारा फुलून गेला होता. श्री देव दांडेश्वर जत्रोत्सवानिमित्त सकाळपासून दांडेश्वर मंदिरात पूजा अर्चा संपन्न झाली. श्री देव दांडेश्वराची मूर्ती सजविण्यात आली होती. तर मूर्तीच्या मागे आकर्षक देखाव्याचे चित्र व फुलांची आरास करून गाभारा सजविण्यात आला होता. सायंकाळी ४ वाजल्यापासून धार्मिक विधी संपन्न झाल्यावर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. तर रात्री मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी उसळून दांडी किनारा भाविकांनी फुलून गेला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जत्रेनिमित्त मंदिरावर तसेच मंदिरासमोरील समुद्र किनाऱ्यावर केलेली विद्युत रोषणाई लक्षवेधी ठरली. तसेच सेल्फी पॉईंटही सर्वांचे आकर्षण ठरले. जत्रेसाठी प्रवेश कमान व स्वागत कमान उभारण्यात आली होती. तर जत्रेदरम्यान समुद्राच्या भरतीचा फटका बसू नये म्हणून किनाऱ्यावर वाळूचा बंधाराही करण्यात आला आहे. तर किनाऱ्यावर विविध स्टॉल व दुकाने थाटण्यात आली होती. रात्री दशावतार नाट्यप्रयोग सादर होऊन पहाटे या जत्रेची सांगता झाली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg