मालवण (प्रतिनिधी) - मालवण नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदाची व दोन स्वीकृत नगरसेवक पदाची निवड आज नगरपालिकेत नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर व मुख्याधिकारी श्री. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी शिंदे शिवसेनेचे नगरसेवक दीपक पाटकर यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध झाली. त्यांना भाजपच्या नगरसेवकांनीही पाठिंबा दिल्याचे दिसून आले. तर स्वीकृत नगरसेवकपदी शिंदे शिवसेनेतर्फे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची तर भाजपतर्फे भाजप मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांची निवड करण्यात आली.
मालवण नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष निवडणुकीसाठी शिंदे शिवसेनेचे शहरप्रमुख तथा दोन टर्म नगरसेवक राहिलेले दीपक पाटकर यांनी मुख्याधिकारी प्रतिक थोरात यांच्याकडे आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. यावेळी शिवसेना व भाजप नगरसेवक एकत्र आल्याचे चित्र दिसून आले. तर स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेकडून महेश कांदळगावकर तर भाजपकडून रविकिरण तोरसकर यांची नावे निश्चित करण्यात आली होती. या निवडीसाठी नगरपालिकेत आयोजित सभेत नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर व मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी कामकाज चालवत निवडीची प्रक्रिया पार पाडली. यावेळी उपनगराध्यक्ष पदासाठी दीपक पाटकर यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणाचाही अर्ज दाखल न झाल्याने उपनगराध्यक्ष पदासाठी दीपक पाटकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे नगराध्यक्ष सौ. वराडकर यांनी जाहीर केले. तसेच स्वीकृत नगरसेवक पदी महेश कांदळगावकर यांची निवड झाल्याचे सौ. वराडकर यांनी जाहीर करत अभिनंदन केले.
यावेळी उपस्थित शिंदे शिवसेना, भाजप व उबाठा शिवसेना पक्षाचे नगरसेवक व अपक्ष नगरसेवक सुदेश आचरेकर तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी नवनियुक्त पदाधिकार्यांचे अभिनंदन केले. तसेच यावेळी शिवसेना गटनेत्या पूनम चव्हाण, नगरसेविका मेघा गावकर, निना मुंबरकर, शर्वरी पाटकर, भाग्यश्री मयेकर, अश्विनी कांदळकर, सिद्धार्थ जाधव, सहदेव बापर्डेकर, महेश कोयंडे, भाजप गटनेत्या अन्वेषा आचरेकर, दर्शना कासवकर, महानंदा खानोलकर, नगरसेवक मंदार केणी, ललीत चव्हाण, सुदेश आचरेकर, ठाकरे गटाचे नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, अनिता गिरकर तसेच उमेश नेरुरकर, स्वप्नाली नेरुरकर, ज्योती तोरसकर, जगदीश गावकर, जॉन नरोना, राजा गावकर, परशुराम पाटकर, सन्मेष परब, मोहन वराडकर, शेखर गाड आदी व इतर उपस्थित होते.
















































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.