loader
Breaking News
Breaking News
Foto

काही वेळेतच मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी, संपूर्ण राज्याचे लक्ष

मुंबई - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी थोड्याच वेळात सुरु होणार आहे. अंतिम निकाल दुपारी ४ वाजेपर्यंत अपेक्षित आहे. १५ जानेवारी रोजी २९ महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीसाठी १५ हजार ९३१ उमेदवार रिंगणात उभे आहेत. आज त्यांचे भवितव्य उघड होणार आहे. गुरुवारी एक्झिट पोलने दिलेल्या अंदाजानुसार मुंबईत महायुतीचे सरकार येईल, असे म्हटले जात आहे मात्र मुंबईकर जनतेचा त्यावर विश्‍वास नसल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. मतमोजणीसाठी निवडणुक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली असून ठाकरे बंधूंचे भवितव्य या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. बीएमसीमध्ये कमळ फुलणार, असाही एक्झिट पोल आहे. तसेच ७० पर्यंत शिवसेना मनसेला जागा मिळतील, असाही एक्झिट पोल आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg