loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्गमध्ये हत्ती पकड मोहीम राबविण्यासाठी शेतकरी बांधवांच्या वतीने जनहित याचिका दाखल करणार - प्रविण गवस

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोर्‍यातील अनेक गावात धुमाकूळ घालणार्‍या जंगली हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी हत्ती पकड मोहीम राबवली जावी, अशी मागणी सतत केली जात आहे. पण कोल्हापूर येथे झालेल्या मुख्य वनसंरक्षक जी. गुरुप्रसाद समवेत झालेल्या बैठकीत हत्ती कॅम्प उभारणीपर्यंत हत्तीपकड मोहीम होणे शक्य नाही. तेव्हा न्यायालयाने वाढते नुकसान लक्षात घेऊन तातडीने इतर हत्तीपकड मोहीम बाबत आदेश द्यावे, यासाठी शेतकरी बांधवांच्या वतीने न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रविण गवस यांनी शेतकरी बांधवांच्या वतीने माहिती देताना सांगितले. दोडामार्ग तालुका हत्तीमुक्त झाला पाहिजे, यासाठी गेल्या २३ वर्षात अनेक आंदोलन उपोषण झाली, पण हत्ती पकड मोहीम राबवली गेली नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हत्ती रोखण्यासाठी उपाययोजना निष्फळ ठरल्या. ओंकार हत्ती याने मोर्ले येथे हल्ला करून एका शेतकर्‍याचा बळी घेतला यानंतर ग्रामस्थ, शेतकरी यांच्या उद्रेकानंतर ओंकार हत्ती पकड मोहीम बाबत आदेश झाले. पण ओंकार हत्ती याला वनतारा मध्ये पाठवायचे हा निर्णय काही जणांना खटकला आणि कोर्टात याचिका दाखल केली. पकड मोहीम थांबली आणि उपद्रव वाढला. यामुळे हत्ती पकड मोहीम राबवली जावी, यासाठी दोडामार्ग वन कार्यालय येथे तीन दिवस ठिय्या आंदोलन केले.

टाइम्स स्पेशल

या नंतर ठरल्या प्रमाणे कोल्हापूर मुख्य वन संरक्षक जी. गुरुप्रसाद यांची भेट घेतली चर्चा झाली. मुंबई येथे वनमंत्री गणेश नाईक यांच्या समवेत बैठक बाबत निर्णय होणार आहे. पण झालेल्या चर्चेत हत्ती पकड मोहीम बाबत ओंकार हत्तीबाबत निर्णय होऊ शकतो. गेल्या २३ वर्षात कशा पद्धतीने शेतकरी बागायती उध्वस्त झाल्या, हे कोर्टात निदर्शनास आणून देण्यासाठी सरपंच सेवा संघटना तसेच शेतकरी यांच्या वतीने न्यायालयात हत्ती पकड मोहीम झाली पाहिजे यासाठी जनहित याचिका हा एक पर्याय आहे. असे प्रविण गवस यांनी पञकाराशी माहिती देताना सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg