loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजप प्रदेशाध्यक्षांची एक चूक आणि लातूर महापालिकेचं मैदान काँग्रेसनं मारलं, विरोधकांचा सुपडासाफ!

लातूर. : मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचे निकाल हळूहळू समोर येत आहे. राज्यातील महापालिकांमध्ये कोणाची सत्ता येणार याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. राज्यातील अनेक महापालिकांमध्ये भाजप व शिंदे यांची शिवसेना आघाडीवर आहे तर काही ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादीने मैदाना मारलं आहे. राज्यात महायुतीची लाट असताना लातूरमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. येथे काँग्रेसने जोरदार मुंसडी मारत वंचित बहुजन आघाडीच्या सोबतीने बहुमताचा आकडा गाठला आहे. काँग्रेस आणि वंचितच्या युतीने लातूर पालिकेत 37 जागा जिंकल्या आहेत. भाजपला केवळ 14 जागा मिळाल्या असून लातूरमध्ये काँग्रेसचा महापौर होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एका प्रचार सभेत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी म्हटले होते की, लातूरमधून माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते दिवंगत विलासराव देशमुख यांची आठवण लोकांच्या मनातून पुसून टाकली जाईल. या वक्तव्यावरून बराच गदारोळ झाला होता. त्यानंतर अभिनेता रितेश देशमुख यानेही चव्हाण यांना उत्तर देत म्हटले होते की, विलासरावांचे नाव लोकांच्या हृदयावर कोरले आहे, ते कोणालाही पुसता येणार नाही. काँग्रेसच्या नेत्यांनीही याचा निषेध केला होता.

टाइम्स स्पेशल

लातूर महानगरपालिकेच्या 70 जाागांसाठी गुरुवारी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सरासरी 60 टक्के मतदान झालं होतं. 70 जागांसाठी एकूण 369 उमेदवार रिंगणात होते. बहुमतासाठी 36 जागांची आवश्यकता आहे. या निवडणुकीत काँग्रेस 65, वंचित बहुजन आघााडी 5 जागा लढवल्या होत्या. विशेष म्हणजे वंचितने पाचही जागा जिंकल्या आहेत. लातूरमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा? एकूण प्रभाग 18 - जागा 70 ; काँग्रेस 32 ,भाजपा - 14 वंचित मबहुजन आघाडी 05

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg