loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत मुख्य बाजारपेठेत पाईपलाईनसाठी खोदलेल्या रस्ताचे डांबरीकरण करण्यास प्रारंभ

सावंतवाडी : मुख्य बाजारपेठेत पाईपलाईनसाठी खोदलेला रस्ता डांबरीकरण करण्यास प्रारंभ झाला. नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर नगरपरिषद बांधकाम विभागाकडून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. नळ-पाण्याची लाईन बदलण्यासाठी शहरातील मुख्य बाजारपेठ रस्ते खोदण्यात आले होते. मात्र, काम पूर्णत्वास येऊन १० दिवस झाले तरी न.प. च्या बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केलं जातं होतं.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

केवळ आश्वासन देत वेळकाढूपणा प्रशासन करत होत. यामुळे येथील व्यापारी, रहिवाशांना धूळीचा त्रास सहन करावा लागत होता. यामुळे नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी आक्रमक पवित्रा घेत तात्काळ डांबरीकरण न केल्यास आज माती अन् खडी नगरपरिषदेच्या दारात आणून ओतण्याचा इशारा दिला होता. यानंतर न.प.च्या बांधकाम विभागाकडून डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg