loader
Breaking News
Breaking News
Foto

कचराकुंडीत सापडलेले नवजात बालक आता सुस्थितीत : नगराध्यक्षा सुर्वे

रत्नागिरी : क्रांतीनगर येथील कचराकुंडीत सापडलेले नवजात बालक आता सुस्थितीत असून या बालकाची काळजी घेण्यासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या डॉक्टरांची टीम कार्यरत आहे. ते त्या बालकाची काळजी योग्य प्रकारे घेत असल्याची माहिती नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी दिली. रत्नागिरी शहरातील क्रांतीनगर परिसरात दोन दिवसांपूर्वी एक नवजात बालक कचराकुंडीत सापडले होते. या बालकाचे पालक अजूनही सापडले नसून या बालकाला जिल्हा शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आलेले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या नवजात बालकाची चौकशी करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे आणि त्यांच्या सर्व महिला नगरसेविका यांनी सोमवारी(दि.१२) सायंकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात भेट देऊन डॉ. विनोद सांगवीकर यांच्याकडे या नवजात बालका विषयी चौकशी केली. त्यावेळी डाॅ. सांगवीकर यांनी नवजात बालकाचे वजन २.५ किलो असून त्याची तब्येत आता चांगली असल्याचे सांगितले.

टाइम्स स्पेशल

नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या समवेत नगरसेविकांमध्ये पूजा पवार, श्रद्धा हळदणकर, वैभवी खेडेकर, प्रिती सुर्वे, मेधा कुलकर्णी, आफ्रिन होडेकर, सुप्रिया रसाळ, वर्षा ढेकणे, निवेदिता कळंबटे, स्मितल पावसकर, रुक्सार खान, जगृती पिलणकर, मानसी करमरकर, सायली पाटील, नाहीदा सोलकर, पालकमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक सागर भिंगारे, युवा सेना उपशहरप्रमुख युवराज शेट्ये उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg