loader
Breaking News
Breaking News
Foto

शिक्षिका मृगया मोरे यांच्या पाच पुस्तकांचे प्रकाशन

लांजा - तालुक्यातील प्राथमिक शिक्षिका मृगया मंगेश मोरे यांनी लिहिलेल्या पाच पुस्तकांचे प्रकाशन रत्नागिरी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. संपूर्ण शालेय व्यवस्थापन सांभाळून आणि विविध उपक्रम राबवून ही पाच पुस्तके लिहिण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बालभारती पुण्याचे विशेष अधिकारी श्री अजय कुमार लोळगे उपस्थित होते. सशक्त, ज्ञानसंपन्न विद्यार्थी व समाज घडवायचा असेल तर शिक्षकांनी 'देणाऱ्याने देत जावे' या उक्तीप्रमाणे तन-मन धन अर्पण करून समाजाचे दिशादर्शक बनणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन बालभारती पुणे विशेषाधिकारी डॉ. अजयकुमार लोळगे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लांजा येथील प्राथमिक शिक्षिका आणि नवोदित लेखिका मृगया मंगेश मोरे यांच्या पंचपुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर न्यायाधीश सुरज मोरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किरण लोहार, डाएट रत्नागिरीच्या वरिष्ठ अधिव्याख्याता दीपा सावंत, झी मराठी हास्य कलाकार श्रीकांत ढालकर, उपशिक्षणाधिकारी सूर्यवंशी, लेखिका मृगया मंगेश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. मृगया मोरे यांनी लिहिलेल्या 'मनाच्या हिंदोळ्यावर', 'मनाच्या तळ्यावरती' हे ललित लेखसंग्रह तसेच 'आजीच्या कुशीतल्या गोष्टी', 'अमुक तमुक गोष्टी' हे बाल तात्पर्य कथासंग्रह आणि 'चिमुकल्यांच्या लेखणीतून' हा त्यांच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कथा, कविता यांचा संग्रह अशा एकूण पाच पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. मृगया मोरे यांनी आजवर नवोपक्रम, कृती संशोधन, शैक्षणिक नियतकालिके, निबंध इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये विपुल लेखन केले आहे.रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासह अनेक मान्यवर संस्थांचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

टाइम्स स्पेशल

प्रकाशन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्रीकांत ढालकर यांनी मृगया मोरे यांचे लेखन म्हणजे 'जुन्या नव्यांचा समन्वय साधण्याचा केलेला यशस्वी प्रयत्न असल्याचे' प्रतिपादन केले. याप्रसंगी न्यायाधीश सुरज मोरे, वरिष्ठ अधिव्याख्याता दीपा सावंत, कार्यक्रमाचे अध्यक्ष किरण लोहार, विद्यार्थिनी सृष्टी गुरव, सुधाकर गंगावणे, विशाल मोरे आदींनी लेखिकेच्या साहित्याविषयी गौरवोदगार काढले. कार्यक्रमाला शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर, मोरे व यादव परिवार, मित्रमंडळी, आप्तेष्ट यांची बहुसंख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील जाधव यांनी केले तर आभार मंगेश मोरे यांनी मानले...

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg