loader
Breaking News
Breaking News
Foto

खासगी गाडीत EVM आढळल्यानं गोंधळ ; नालासोपाऱ्यात खळबळ

नालासोपाऱ्यामध्ये एका खासगी कारमध्ये तीन इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) आढळल्याने परिसरात मोठा गोंधळ आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना समोर आल्यानंतर माजी आमदार क्षितीज ठाकूर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, खासगी वाहनात EVM मशीन आढळल्यानंतर सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कर्मचाऱ्यांनी ही मशीन राखीव स्वरूपातील असल्याचे सांगितले, मात्र याबाबत जनतेकडून अनेक प्रश्न विचारले जात आहेत. कारमध्ये सुरक्षारक्षक किंवा पोलीस उपस्थित नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. केवळ दोन व्यक्ती उपस्थित असल्याचे बोलले जात आहे. सकाळी वापरलेली मशीन कुठे गेली याबाबतही प्रश्न विचारले जात आहेत. या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg