loader
Breaking News
Breaking News
Foto

शासकीय रेखाकला परीक्षेत रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलचा 100 टक्के निकाल

खेड - कला संचालनालय मार्फत घेण्यात आलेल्या इलेमिंटरी व इंटरमिजीएट या शासकीय रेखाकला परीक्षेत रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादित करुन आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. या दोन्ही परीक्षेत एकूण 69 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. इलेमिंटरी परीक्षेत आऐशा तांबट, आराध्या क्षीरसागर, ईश्वरी माळी, रुहाब रावळ, शेरॉन मुक्कु, शर्वरी सावर्डेकर, श्रावणी काणेकर, ताशी पटेल, यती खेडेकर, झोया नागुठणे या विद्यार्थीनींनीे (अ श्रेणी ) प्राप्त केली आहे. तर अनु गुप्ता, अथर्व नक्षे, दुर्गा भोसले, कबीर केसरकर, मृण्मयी दामले, नुरैन परकार, पार्थ पाटील, प्रिशा शिगवण, सई कदम, समृध्दी कोठारे, सारा परकार, सिध्दी पेवेकर, स्वरा शहा, युवराज देवघरकर या विद्यार्थ्यांनी ( ब श्रेणी) प्राप्त केली तर 17 विद्यार्थ्यांनी (क श्रेणी) प्राप्त केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच इंटरमिजीएट परीक्षेत अंचल राजवडकर, मृणाल भोसले, ओम ढेपे, समर्थ गावीत, श्रेया गायकर, स्वरा पोरे, जरीन अत्तार यांनी (अ श्रेणी ) प्राप्त केली. दक्ष शिंदे, इच्छा कोकाटे, जिया चव्हाण, मसिरा तांबे, निखील लाड, राजस्वी डोंगरे या विद्यार्थ्यांनी (ब श्रेणी) प्राप्त केली तर 15 विद्यार्थ्यांनी (क श्रेणी) प्राप्त केली आहे. रेखाकला परीक्षेतील या यशामधून सर्व विद्यार्थ्यांनी कलेतील निकालाचा आलेख चढता ठेवला आहे. या दोन्ही परीक्षांचे केंद्र एम. आय. हजवानी हे होते. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील कला शिक्षिका कविता सोनवडकर, गुरुप्रसाद देवघरकर, शुभम जड्याळ व साक्षी दांडेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg