loader
Breaking News
Breaking News
Foto

बांदा सटमटवाडी परिसरात अज्ञात व्यक्तीने केली जलवाहिनीची तोडफोड

बांदा (प्रतिनिधी) - बांदा सटमटवाडी परिसरात अज्ञात व्यक्तीने जलवाहिनीची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून यामुळे शहरातील तीन वाड्यांचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. या प्रकरणी बांदा ग्रामपंचायत प्रशासनाने बांदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात इसमाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सटमटवाडी येथील सार्वजनिक विहिरीवरून रामनगर, देऊळवाडी आणि मीठगुढी या वाड्यांना पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने ही जलवाहिनी धारदार हत्याराच्या साहाय्याने फोडली. सकाळी पाणी न आल्याने नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी तातडीने ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनेची माहिती मिळताच ग्रामविकास अधिकारी आदम शहा यांनी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान जलवाहिनी मुद्दामहून फोडण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून ग्रामपंचायतीकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, भाजपा बांदा शहर अध्यक्ष बाबा काणेकर यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. “सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या साधनांची तोडफोड करणे हा नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर घाला आहे. अशा समाजविघातक कृत्यांमुळे सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जात आहे. पोलीस प्रशासनाने यामागील दोषींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली.

टाइम्स स्पेशल

या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून दोषींना तातडीने पकडून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg