loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली शहरात 'काळू-बाळू' जोडीचा धुमाकूळ; व्यापारी आणि नागरिक हैराण

संगलट खेड( इक्बाल जमादार) - कोकणची महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोली शहरात सध्या उनाड गुरांच्या त्रासाने कळस गाठला आहे. विशेषतः शहराच्या बाजारपेठ परिसरात 'काळू' आणि 'बाळू' या नावांनी ओळखले जाणारे दोन बैल सध्या व्यापारी, भाजी विक्रेते आणि ग्राहकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन बैल दिवसभर बाजारपेठेत ठाण मांडून असतात. भाजी मार्केटमधील विक्रेत्यांच्या दुकानावर अचानक धाड टाकून भाजीपाला फस्त करणे हा या बैलांचा नित्यक्रम झाला आहे. यामुळे गरीब भाजी विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. केवळ भाजी खाण्यापुरतेच मर्यादित न राहता, रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाकींना धडक देऊन त्या पाडण्याचे प्रकारही वाढले आहेत. यामुळे अनेक वाहनधारकांच्या गाड्यांचे नुकसान झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोलीची बाजारपेठ अरुंद असून, त्यातच हे दोन बैल रस्त्याच्या मध्यभागी येऊन उभे राहतात किंवा आपसात लढू लागतात. यामुळे तासनतास वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या ग्राहकांना शिंगे उगारून अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडत असल्याने महिला आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. "आम्ही व्यवसाय करायचा की या बैलांना हाकलायचे?" असा संतप्त सवाल स्थानिक व्यापाऱ्यांनी विचारला आहे. दुकानासमोर उभे राहून हे बैल ग्राहकांना आत येऊ देत नाहीत, आणि त्यांना हटवण्याचा प्रयत्न केल्यास ते अधिक हिंसक होतात. शहरातील या वाढत्या त्रासाकडे दापोली नगरपंचायतीने गांभीर्याने लक्ष देऊन या उनाड गुरांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg