loader
Breaking News
Breaking News
Foto

वरसे अंतर्गत जि.प.शाळांना सेन्सिस्को कंपनीच्या सीएसआरच्या माध्यमातून संगणक व साहित्य भेट

रोहा (दिप वायडेकर) - रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात ग्रुप ग्रामपंचायत वरसे अंतर्गत येणार्‍या भुवनेश्वर, निवि ,वरसे, निवी ठाकूरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेंना संगणक आणि साहित्य भेट देण्यात आले. औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या सेन्सिस्को कंपनीच्या सीएसआर म्हणजेच कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व या विशेष निधी अंतर्गत या शाळांना ही भेटवस्तू देण्यात आल्या आहेत. माजी सरपंच अमित लक्ष्मण मोहिते यांच्या विशेष प्रयत्नातून हे सर्व शक्य झाले, त्याचप्रमाणे तत्त्वराज फाउंडेशनच्या कुमारी रुचिता जैन यांच्या विशेष सौजन्याने हा संपूर्ण कार्यक्रम करण्यात आला. या प्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत वरसे सरपंच रामाशेठ म्हात्रे, माजी सरपंच अमित मोहिते, नरेश पाटील, माजी उपसरपंच शांतीशील तांबे, तंटामुक्तीचे अध्यक्ष तुकाराम पाटील आदी सदस्य त्याचप्रमाणे शाळा प्रशासनाचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg