loader
Breaking News
Breaking News
Foto

महावितरणच्या स्मार्ट मीटर विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आक्रमक

लांजा (वार्ताहर) - महावितरणतर्फे लावण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटर विरोधात आज लांजा तालुका शिवसेनेने जाब विचारला. लोकांची तक्रार नसताना अगदी घरी कुणीही नसताना जूने मीटर बदलण्याचा भीम पराक्रम महावितरणद्वारे करण्यात आल्याच्या तक्रारी ग्राहकांनी शिवसैनिकांकडे केल्यानंतर शिवसैनिक शहर प्रमुख मोहन तोडकरी यांच्या नेतृत्वाखाली लांजा महावितरणच्या कार्यालयावर धडकले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वारंवार नेत्यांनी पत्रव्यवहार करून देखील महावितरण स्मार्ट मीटर का लावत आहे, यासंदर्भात विचारणा केली. स्मार्ट मीटर संबंधात शासनाची वारंवार बदलणारी भूमिका पाहता, "आपली ही गळचेपी भूमिका खपउन घेतली जाणार नाही" असे युवा तालुका अधिकारी अभिजीत राजेशिर्के यांनी ठणकावून सांगितले. लवकरात लवकर स्मार्ट मीटर संदर्भात जनसुनावणी घ्यावी, नाहीतर मीटर ची होळी करणार असल्याची भूमिका शिवसैनिकांनी घेतली.

टाईम्स स्पेशल

चर्चेनंतर महावितरणने लवकरच जनसुनावणी घेण्याचे आश्वासन दिले. आश्वासनाची अंमलबजावणी होईपर्यंत तक्रारीशिवाय कुणाचेही मीटर बदलू नये असे शिवसेनेतर्फे सांगण्यात आले. यावेळी शहर प्रमुख मोहन तोडकरी, युवा अधिकारी अभिजीत राजेशिर्के, पिंट्या लिंगायत, जेष्ठ कार्यकर्ते बाबू गुरव, सुजित भुर्के, बाबा धावणे व पदाधिकारी हजर होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg