loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात धनदांडग्या महिला उमेदवारासमोर सर्वसामान्य उच्चशिक्षित उमेदवाराचे कडवे आव्हान

ठाणे (अमोल पवार) - ठाण्यात प्रचाराचा धुराळा उडाला असताना धनदांडग्या उमेदवारांची चर्चा चांगलीच रंगली आहे. यंदाच्या निवडणुकीच्या रिंगणात अनेक कोट्याधीश उमदेवार यांची नावे समोर आली. मुंबई ठाण्यातील श्रीमंत महिला उमेदवारांचा श्रीमंतीचा रेकॉर्ड राज्य सरकारमधील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पत्नी परिषा सरनाईक यांनी मोडला आहे. यांच्याकडे ३८१ कोटीची अफाट संपत्ती आहे.मागील २०१७ मध्ये निवडणुकीत त्यांनी एकूण स्थावर मालमत्ता व जंगम संपत्ती ३८ कोटी ७३ लाख ६४ हजार २८८ रुपये त्यांनी प्रतिज्ञापत्रात जाहीर केले होते दायित्व ४ कोटी ९३ लाख ४४ हजार ६३६ प्रतिज्ञापत्रात दाखविले होते. सन २०१७ ते सन २०२५ च्या कालावधीत काही वर्ष करोनाचा काळ होता तरीदेखील गेल्या ८ वर्षानंतर त्यांनी संपत्नी तब्बल ३८१ कोटी ८८ लाख ९३ हजार ५३८ रुपये दाखविली. आठ वर्षात त्यांच्या एकूण संपत्तीत सुमारे ८९ टक्के वाढ होत तब्बल ३४३ कोटी १५ लाख २९ हजार २५० रुपयांची वाढ झाली. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न त्यांनी २ कोटी ६० लाख ७५ हजार ६८० तर दायित्व २७० कोटी ५५ लाख ६१ हजार २४ दाखविले आहे. ठामपा प्रभाग क्र.५ क मध्ये परिषा सरनाईक ह्या शिंदे गटाच्या शिवसनेच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांच्या समोर उच्चशिक्षित उमेदवारांचे कडवे आव्हान आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महविकास आघाडीत असताना प्रताप सरनाईक यांची मालमत्ता ईडीनं जप्त केली होती. त्यानंतर भाजपा युतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यावर सरनाईक यांना परिवहन मंत्रिपद देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. ठामपा प्रभाग क्र.५ मध्ये पवार नगर, वसंत विहार, शिवाई नगर, येऊर, कोकणीपाडा रामबाग ह्या परिसराचा समावेश होत आहे. ह्या परिसरात ८० टक्के मतदार हे उच्चशिक्षित आणि सुशिक्षित मतदार आहेत. ह्या प्रभागात धर्मवीर कै आनंद दिघे यांनी पथदिवे लावत. या परिसराचा विकासाचा कायापालट केला होता. ५ क मध्ये परिषा सरनाईक यांनी त्यांचे शिक्षण १२ वी पास दाखविले आहेत. प्रभाग क्र.५ क हा उच्चशिक्षित मतदारांचा प्रभाग असल्याने त्यांच्यासमोर मध्यमवर्गीय उच्चशिक्षित उमेदवार यांचे कडवे आव्हान असल्याने शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराला ह्या प्रभागात मोठी कसरत घ्यावी लागत आहे. परिषा सरनाई यांना ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार दीपाली दिनेश घोसाळकर याच्या सह अपक्ष उमेदवार श्रद्धा विजय केणी, स्नेहल अरुण खेतले या तीन उच्चशिक्षित उमेदवारांसह भाजपच्या बंडखोर अपक्ष उमेदवार माजी नगरसेविका रागिणी भास्कर बेरीशेट्टी यांनी अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दीपाली घोसाळकर ह्या वाणिज्य शाखेच्या पदवीधर असून सर्वसामान्य तरुण गृहिणी उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहेत त्यांनी एकूण मालमत्ता १ कोटी ८९ लाख २८ हजार ८४९ तसेच ७८ लाख देय आहेत.

टाइम्स स्पेशल

अपक्ष तरुण उमेदवार श्रद्धा विनय किणी यांनी मास्टर इन मार्केटींग मध्ये शिक्षण घेतले आहेत. त्यांनी एकूण मालमत्ता ३ कोटी ६९ लाख ३६ हजार दाखविली आहे. अपक्ष तरुण उमेदवार स्नेहल अरुण खेतले ह्या वाणिज्य शाखेच्या पदवीधर आहेत. त्यांनी एकूण मालमत्ता ५ लाख २९ हजार दाखविली आहे, माजी नगरसेविका रागिणी भास्कर बैरशेट्टी यांचे भाजपने तिकीट कापल्याने त्यांनी भाजपात बंडखोरी करीत पक्षाने अन्याय केल्याने त्या अपक्ष निवडणूक लढवीत आहेत. त्यांनी एकूण मालमत्ता ३ कोटी ९ लाख ३९ हजार ४९९ तर देय १ कोटी ७२ लाख १२१ प्रतिज्ञापत्रात दाखविले आहे, मागील निवडणुकीत त्यांनी १ कोटी ३८ लाख ९४ हजार एकूण मालमत्ता दाखविली होती. या प्रभागात उमेदवारांनी प्रभागात पायवाट, गटार, रस्ते, वाहतूक कोंडी, वाचनालय, अभ्यासिका, २४ तास पाणी, महिला सुरक्षा, उद्याने, मैदान, बस व्यवस्था, आरोग्य शिबिरे या सुविधा पुरविण्याचे जनतेला आश्वासन दिले आहे. ठाणे जिल्ह्यात मंत्रिमंडळात एकमेव मंत्र्याच्या पत्नीला उमेदवारी मिळालेल्या सर्वात श्रीमंत उमेदवार असलेल्या परिषा सरनाईक यांच्यासमोर उच्चशिक्षित, उमेदवार आणि भाजप बंडखोर अपक्ष अनुभवी उमेदवारांचे कडवे आव्हान निर्माण झाले आहे. उद्धव सेनेने ह्या प्रभागात CHANGE IS OUR RESPONSIBILITY अशा तबलाईनचे इंगजी बॅनर उभारत उच्चशिक्षित मतदारांना आवाहन केल्याने शिंदे सेनेच्या उमेदवारांना मोठे आव्हान निर्माण केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg