loader
Breaking News
Breaking News
Foto

वराडकर हायस्कूल कट्टाचा शासकीय रेखाकला परीक्षेचा निकाल 100%

मालवण (प्रतिनिधी) - सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा या प्रशालेचा एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला. एलिमेंटरी परीक्षेत एकूण 24 विद्यार्थी प्रविष्ट झाले. यात चंदना बाळकृष्ण शेटये, देवांग नितीन नांदोसकर, हेमंत शशिकांत तिळवे या विद्यार्थ्यांनी 'ए' श्रेणी प्राप्त केली. तसेच धनश्री वैभव आचरेकर, पल्लवी सुशांत पोखरणकर,सुरेश सुहास सावंत, विघ्नेश निलेश गावडे या विद्यार्थ्यांनी 'बी' श्रेणी प्राप्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

इंटरमिजिएट परीक्षेत एकूण अठरा विद्यार्थी प्रविष्ट झाले. यात सेलीना अल्बर्ट डान्ट्स, ईशा वल्लभ ताम्हणकर, कार्तिक अनिल पाताडे, कृतिका देवेंद्र लोहार, ओमकार सागर रोहीलकर, सिद्धी जितेंद्र महाभोज, सिल्की विजय मिस्त्री या विद्यार्थ्यांनी 'ए' श्रेणी प्राप्त केली. तसेच अनुकल्प अमित पवार, गौरांग गणेश वाईरकर, रंजन लक्ष्मण पांचाळ, वैष्णवी प्रसाद थवी या विद्यार्थिनी 'बी 'श्रेणी प्राप्त केली. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका सौ देवयानी गावडे, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, तसेच संस्था चालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg