loader
Breaking News
Breaking News
Foto

वरवेली लोहारवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण भूमिपूजन सोहळा संपन्न

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील वरवेली लोहारवाडी येथील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण गुहागरचे लोकप्रिय आमदार भास्कर जाधव यांच्या निधीतून तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाचे भूमिपूजन वरवेली ग्रामपंचायतचे सरपंच नारायण आगरे यांच्या हस्ते करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रम प्रसंगी प्रशांत विचारे, गणेश किर्वे ,ग्रामपंचायत सदस्य नरेश रांजाणे , अरुण रावणंग, लोहारवाडी अध्यक्ष नरेश करंदेकर, महिला अध्यक्ष लक्ष्मी करंदेकर, संदीप चांदोरकर, चंद्रकांत करंदेकर, नयन चांदोरकर, रमेश करंदेकर, संकल्प पोमेंडकर, रांजाणेवाडी अध्यक्ष अनंत जावळे, तेलीवाडी अध्यक्ष दीपक किर्वे, जितेंद्र विचारे, नारायण रांजाणे, यशवंत रांजाणे, सहदेव रांजाणे, शांताराम रांजाणे, राजेश करंदेकर, धनश्री चांदोरकर आदी मान्यवरांसह श्री विश्वकर्मा वरवेली लोहारवाडी मंडळातील सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी संदीप चांदोरकर यांच्या निवासस्थानी मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. श्री विश्वकर्मा वरवेली लोहारवाडी यांच्यावतीने मंडळाचे अध्यक्ष नरेश करंदेकर व सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सरपंच नारायण आगरे व सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg