रत्नागिरी (वार्ताहर) - अपघातात रस्त्यावर कोसळलेल्या महिलेच्या अंगावरुन चार चाकी वाहन गेल्याने झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाला. रत्नागिरी शहरात गोगटे कॉलेजकडे जाणार्या मार्गावर लाला कॉम्प्लेक्सनजिक रविवारी रात्री ८ वा.च्या दरम्यान हा अपघात झाला.
पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहरात हिंदू कॉलनी परिसरात राहणार्या सुनिता राजेश साळवी (वय ५८) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. काँग्रेस भवननजिक असलेल्या सहेली ब्युटी पार्लरमधील आपले काम आटोपून त्या आपल्या दुचाकीने निघाल्या होत्या. गोगटे कॉलेजनजिक त्यांचे काहीतरी काम असल्याने त्या या मार्गावरुन जात असताना मागून येणार्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्या रस्त्यावर पडल्या. याच दरम्यान मागून भरधाव येणार्या चार चाकी गाडीने त्यांना अक्षरश: चिरडले.
अपघातानंतर चारचाकी वाहन चालक गाडीसह तेथून पळून गेला. आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत त्यांना रुग्णालयात हलविले. मात्र गंभीररित्या जखमी होऊन मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झालेल्या या महिलेचा उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र या परिसरात पथदीप नसल्याने काळोखाचे साम्राज्य पसरलेले होते. सीसीटीव्हीतही कोणतेही फुटेज प्राप्त होऊ शकले नाही. यामुळे नेमकी कोणत्या वाहनाने धडक दिली हे पोलिसांनाही समजू शकले नाही. रात्री उशीरापर्यंत याचा शोध घेण्याचे काम सुरू होते.






















































































.jpg)
















































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.