loader
Breaking News
Breaking News
Foto

उन्हवरे गरम पाण्याच्या कुंडाची दयनीय अवस्था

संगलट (खेड)(इक्बाल जमादार) - दापोली तालुक्यातील प्रसिद्ध आणि औषधी गुणधर्मांसाठी ओळख असलेलं उन्हवरे गरम पाण्याचं कुंड सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. कुंड परिसरात कचरा साचलेला असून शेवाळामुळे पाणी आणि पायर्‍या निसरड्या झाल्या आहेत. कुंडावरील कौलारू छप्पर मोडकळीस आलेलं असल्याने कोणत्याही क्षणी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष देणे गरजेचे आहे. स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. अस्वच्छतेमुळे पर्यटकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून, पर्यटनाच्या नावाने ओळख असलेल्या दापोली तालुक्याच्या प्रतिमेलाही याचा फटका बसत आहे. पर्यटक येथे येतात, मात्र मूलभूत सुविधा, स्वच्छता व सुरक्षिततेचा अभाव स्पष्टपणे जाणवतो. नैसर्गिक ठेव्याचा र्‍हास थांबवण्यासाठी, नैसर्गिक वारसाचं जतन करण्यासाठी प्रशासनाने उन्हवरे गरम पाण्याच्या कुंडाची तात्काळ स्वच्छता, दुरुस्ती व देखभाल करण्याची जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg