loader
Breaking News
Breaking News
Foto

ओमकार सेवा मंडळ मौजे मढाळ कारकरवाडी, गुहागर येथे रंगणार पहिल्या महिला नमनाचा कार्यक्रम

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर तालुक्यातील ओमकार सेवा मंडळ मौजे मढाळ कारकरवाडी येथे प्रतिवर्षाप्रमाणे माघी गणेश जयंती उत्सव व श्री सत्यनारायण महापूजा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ओमकारेश्वर पालखी मिरवणूक सोहळा, अभिषेक, श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी 4 वाजता हळदिकुंकू समारंभ, तसेच महाप्रसाद लहान मुलांचे मनोरंजनात्मक कार्यक्रम, मंडळाचे सुस्वर भजन व रात्रौ 10:30 वाजता रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांनीच सादर केलेले आभार सस्था संचलित माऊली महिला नमन मंडळ रत्नागिरी यांचे पौराणिक ब्रह्मसत्य गण व विनोदी गौळणीची नटखट गौळण व सिता स्वयंवर हे वगनाट्य असा कार्यक्रम सादर होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमाचा लाभ सर्वानी घ्यावा, असे आवाहन मुंबई मंडळाचे अध्यक्ष दिनेश कारकर व स्थानिक कार्यकारणी अध्यक्ष भालचंद्र कारकर यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg