loader
Breaking News
Breaking News
Foto

वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात “रन फॉर स्वदेशी” उपक्रमाचे आयोजन

वेळणेश्वर (वार्ताहर) - गुहागर तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वरमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या १६४ व्या जयंतीनिमित्त व राष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालयात “रन फॉर स्वदेशी (स्वदेशी संकल्प रन)” या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात एकूण ५८ विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संतोष चतुर्भुज यांनी सहभागी सर्वांना शुभेच्छा देत स्वदेशी, आत्मनिर्भर भारत, शिस्त व राष्ट्रनिर्मितीचे महत्त्व अधोरेखित केले. प्रभारी प्राचार्य यांच्या उपस्थितीत या धावण्याच्या स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. सहभागी विद्यार्थ्यांनी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने या उपक्रमात सहभाग नोंदवला. स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले. गट एक पुरुषांमध्ये मध्ये साहिल इब्रांपूरकर (प्रथम क्रमांक), साहिल खापरे (द्वितीय क्रमांक), शंतनू गुरव (तृतीय क्रमांक) प्राप्त झाले. गट दोन महिलांमध्ये वेदिका सकपाळ (प्रथम क्रमांक), ईशा हेगिष्टे (द्वितीय क्रमांक), कुमुदिनी शिगवण (तृतीय क्रमांक) यांना प्राप्त झाले.

टाइम्स स्पेशल

विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रभारी प्राचार्य डॉ. संतोष चतुर्भुज, विभागप्रमुख, क्रीडा समन्वयक प्रा. औदुंबर पाटकर व NSS समन्वयक यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल क्रीडा समिती, NSS स्वयंसेवक व सर्व सहभागी यांचे विशेष कौतुक करण्यात आले. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये स्वदेशी विचारसरणी, शारीरिक तंदुरुस्ती, संघभावना आणि राष्ट्रभक्ती वाढविण्यास निश्चितच प्रेरणादायी ठरला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg