loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ सिंधुदुर्गचे त्रैवार्षिक अधिवेशन

कुडाळ (प्रतिनिधी) - आपण नशिबाला दोष न देता नशीब सोबत घेऊन पुढे गेल्यास यश दूर नाही. अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे महावितरण कामगारांवर अन्याय झाला, त्यावेळी आम्ही संघटितपणे लढा दिला व यशस्वी झालो. भविष्यात सर्वांनी गटबाजी न करता एकत्र यावे असे प्रतिपादन वीजवितरण कंत्राटी कामगारांचे नेते आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत यांनी वीज कंत्राटी कामगार यांच्या त्रैवार्षिक अधिवेशनात बोलताना केले. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाचे सिंधुदुर्ग जिल्हा अधिवेशन संघटनेचे राज्य नेते सागर पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी राज्य पातळीवरील नेते सत्यविजय जाधव, गोपाळ कुलकर्णी, कृष्णांत बच्चेपाटील, केंद्रीय कार्यकारणी सदस्य संभाजी उर्फ आनंद लाड, जिल्हा अध्यक्ष संदीप बांदेकर, दिनेश तांबे, मोहन गावडे, सचिन राघव, सर्वेश राऊळ, संजय गोवेकर, महेश राऊळ तसेच महानिर्मिती महापारेषण महावितरण विभागात काम करणारे जिल्ह्यातील वीज कंत्राटी कामगार उपस्थित होते. यावेळी केंद्रीय कार्यकारणीवर निवड झालेले माजी जिल्हाध्यक्ष आनंद लाड तसेच नूतन जिल्हाध्यक्ष संदीप बांदेकर व त्यांची टीम यांचा मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg