loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदी मिनार चिखले व संजय मोदी यांची नियुक्ती 

खेड(प्रतिनिधी) – नुकत्याच झालेल्या खेड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर महायुतीच्या वर्चस्वाची अधिकृत मोहर ठरणारी महत्त्वाची नियुक्ती आज जाहीर झाली. माजी नगरसेवक मिनार चिखले आणि मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तसेच खेडचे माजी शहरप्रमुख संजय मोदी यांची खेड नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीनंतर नगरपरिषदेमध्ये महायुतीची ताकद अधिक दृढ झाली असून राजकीय वर्तुळात ही नियुक्ती विशेष चर्चेचा विषय ठरली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या दोघांनीही नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये निवडणूक प्रमुख म्हणून अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांना दिशा देणे, रणनिती आखणे व मतदारांशी थेट संपर्क साधणे या सर्व स्तरांवर त्यांनी दाखवलेल्या नेतृत्वाला महायुतीच्या विजयानंतर मोठ्या प्रमाणावर दाद मिळाली. या निवडणुकीत खेड नगरपरिषदेवर निर्विवाद वर्चस्व मिळवत एकहाती सत्ता प्रस्थापित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे मानले जाते.

टाईम्स स्पेशल

महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्या निकटवर्तीय व विश्वासू अशी त्यांची ओळख राजकीय क्षेत्रात कायम राहिली आहे. संघटनात्मक शिस्त, प्रामाणिकपणा आणि कार्यकर्त्यांमध्ये असणारी त्यांची लोकप्रियता यामुळे त्यांच्यावर स्वीकृत नगरसेवकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे महायुतीतील सूत्रांचे मत आहे. या नियुक्तीमुळे नगरपरिषदेच्या कामकाजात अधिक अनुभवसंपन्नता येईल, विकासकामांना गती मिळेल आणि मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg