loader
Breaking News
Breaking News
Foto

कणकवलीत १८ जानेवारीला बॅ. नाथ पै यांचा ५५ वा स्मृतीदिन सोहळा

मालवण (प्रतिनिधी) - लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते आणि थोर समाजवादी नेते बॅ. नाथ पै यांचा ५५ वा स्मृतीदिन यावर्षी 'राष्ट्र सेवा दल, सिंधुदुर्ग' शाखेच्यावतीने दि. १८ जानेवारी रोजी गोपुरी आश्रम, वागदे कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ समाजवादी नेत्या श्रीमती कमलताई परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे. सेवा दलाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यंदाचा स्मृतीदिन "बॅ. नाथ पै स्मृती ५५ - एक पाय ज्याचा तुरुंगात आणि दुसरा संसदेत" या विशेष संकल्पनेवर आधारित आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक क्षेत्रातील अभ्यासक आनंद शितोळे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. ते 'जल-जंगल-जमीन: काल, आज आणि उद्या' या विषयावर विचार मांडणार आहेत. या सोहळ्याला सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. प्रविण बांदेकर, सेवा दलाचे ज्येष्ठ राष्ट्रीय कार्यकर्ते बाबासाहेब नदाफ, लेखक नितीन साळुंखे आणि 'रानमाणूस' म्हणून ओळखले जाणारे प्रसाद गावडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. गोपुरी आश्रमाच्या 'मुक्तपीठ' (चिकू बाग) येथे सकाळी १० वाजल्यापासून कार्यक्रमाची सुरुवात होईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

१८ जानेवारीला सकाळी १० ते १०.३० यावेळेत नाव नोंदणी व अल्पोपहार, ११ वाजता अभिवादन, 'खरा तो एकची धर्म' प्रार्थना व दल गीताचे सादरीकरण (बाबासाहेब नदाफ), ११.२० वाजता स्वागत व प्रस्तावना नितीन वाळके आणि सुहास ठाकूरदेसाई करतील. प्रा. प्रविण बांदेकर यांचे बॅ. नाथ पै यांचे स्वप्न आणि वास्तव यावर व्याख्यान होईल. नितीन साळुंखे यांचे मी आणि संघ या विषयावर व्याख्यान होईल. आनंद शितोळे यांचे जल-जंगल-जमीन या विषयावर व्याख्यान होईल. बाबासाहेब नदाफ यांचे सेवा दल विचार आणि भवितव्य या विषयावर व्याख्यान होईल. प्रसाद गावडे यांचे रानमाणसाच्या व्यथा आणि कथा या विषयावर व्याख्यान होईल. दुपारी १.३० वाजता श्रीमती कमलताई परुळेकर यांचे मनोगत होईल. २ ते ३ यावेळेत सहभोजन, ३ ते ४.३० यावेळेत मुक्त चर्चा व २०२६ सालातील उपक्रमांची आखणी, ४.४५ वाजता समारोप होईल.

टाइम्स स्पेशल

कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी विनायक (बाळू) मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. यात सुहास ठाकूरदेसाई, संजय वेतुरेकर, नितीन वाळके, डॉ. सुभाष सावंत, मूर्ती कासार, सहदेव पाटकर, सुचन कोरगांवकर, विजयालक्ष्मी चिंडक, अर्पिता मुंबरकर, प्रज्ञानकुमार गाथाडे आणि पूजा वेतुरेकर यांचा समावेश आहे. बॅ. नाथ पै आणि प्रा. मधू दंडवते यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष ॲड. प्रविण नाईक यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg