loader
Breaking News
Breaking News
Foto

आचरा पारवाडी दिंडीच्या कलाविष्काराने पंढरपूर नगरी दुमदुमली

मालवण (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यात नावाजलेल्या श्री ब्राह्मणदेव सांस्कृतिक दिंडी भजन मंडळ आचरा पारवाडी या दिंडी भजन मंडळाने पंढरपुर येथे विठ्ठल मंदिर नामदेव पायरी समोर सादर केलेल्या दिंडी भजनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना विठ्ठल दर्शनासोबत तुकोबा महाराजांचेही दर्शन आगळी अनुभूती देऊन गेले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आचरा पारवाडी येथील दिडी भजन मंडळाने पंढरपुर वारीचे नियोजन करत अक्कलकोट स्वामी समर्थ, तुळजाभवानी दर्शन घेऊन पंढरपुर येथे विठ्ठल चरणी लीन झाले. यावेळी नामदेव पायरी समोर वारकरी वेषात विठ्ठल नामाचा गजर करत पावलानृत्य सादर केले. या आगळ्या वेगळ्या सादरीकरणाने ‌पंढरपुरातील सर्व भाविकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमात संत तुकाराम महाराजांची भूमिका करणारे अवि परब यांच्या अभिनयाने साक्षात तुकोबा रायांचे दर्शन झाले.

टाइम्स स्पेशल

आचरा पारवाडीतील या पंढरीच्या वारीत दिंडी समूहातील एकूण ५३ सदस्य सहभागी झाले होते. या वारीत आचरे पारवाडीतील सर्व भक्तजनांनी पांडुरंगाच्या चरणी लिन होऊन आपले सेवारूपी दिंडी भजन सादर केले. आणि या 'धार्मिक सांस्कृतिक सहली' चे संपूर्ण नियोजन श्री ब्राह्मणदेव सांस्कृतिक दिंडी मंडळ यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg