loader
Breaking News
Breaking News
Foto

नवी मुंबईत एकनाथ शिंदेंना धक्का! भाजपने मारली बाजी; 111 पैकी 62 जागांवर आघाडी

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने आघाडीमध्ये थेट बहुमताचा आकडा ओलांडत महापालिकेवर आपला दबदबा स्पष्ट केला आहे. एकूण 111 जागांपैकी भाजप आघाडीवर तब्बल 62 जागांवर असून, स्पष्ट बहुमताच्या दिशेने भाजपाने भक्कम वाटचाल केली आहे. आतापर्यंतच्या आघाडीच्या आकड्यांनुसार भाजप 62 जागांवर आघाडीवर आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मात्र अपेक्षेप्रमाणे यश मिळालेलं नसून ते अवघ्या 27 जागांवर आघाडीवर आहेत. मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला प्रत्येकी केवळ एका जागेवर आघाडी मिळाल्याचं चित्र आहे. उर्वरित जागांवर अपक्ष आणि इतर लहान पक्ष आघाडीवर असल्याची माहिती आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या निकालांकडे पाहता नवी मुंबईतील मतदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा भाजप नेते गणेश नाईक यांच्या नेतृत्वावर अधिक विश्वास दाखवल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. अनेक प्रभागांमध्ये भाजप उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली असून, संघटनात्मक ताकद आणि स्थानिक नेतृत्वाचा प्रभाव या निकालातून ठळकपणे समोर आला आहे.महायुतीत असतानाही शिंदे गटाची कामगिरी मर्यादित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दुसरीकडे, मनसे आणि ठाकरे गटाला अत्यल्प जागांवर आघाडी मिळाल्याने नवी मुंबईत विरोधकांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे.

टाइम्स स्पेशल

111 सदस्यांच्या सभागृहात सत्तेसाठी 56 जागांची आवश्यकता असते. भाजपाने 62 जागांवर आघाडी घेतल्याने एकहाती सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे येत्या काही तासांत नवी मुंबई महानगरपालिकेत भाजपचा महापौर आणि स्थायी समितीवर भाजपचं वर्चस्व असण्याची शक्यता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg