loader
Breaking News
Breaking News
Foto

वेलदूर नवानगर मराठी शाळेची काशविंडा येथे क्षेत्रभेट

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील आदर्श शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेची क्षेत्रभेट गुहागर एसटी आगार, श्री दुर्गा देवी मंदिर, श्री गणपती मंदिर, श्री व्याडेश्वर मंदिर, तवसाळ येथील श्री महामाई सोनसाखळी देवीचे मंदिर, काशविंडा बीच, श्री वेळणेश्वर मंदिर, लक्ष्मी गणेश मंदिर आदी ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील पाठ्यक्रमासोबतच प्राचीन कला परंपरांचे दर्शन घडविण्यात आले. विविध मंदिरातील स्थापत्यशैली, ग्रामीण कलाकार लघु उद्योजक ग्रामीण जीवन, गुहागर तालुक्याला लाभलेला प्राचीन वारसा याबाबत प्रत्यक्ष माहिती देण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गुहागर एसटी आगारला भेट देऊन आगार व्यवस्थापक अशोक चव्हाण यांच्याशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला. निसर्गाच्या कुशीत तवसाळमध्ये असलेले व हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री महामाई सोनसाखळी देवीच्या मंदिरात देवीचे दर्शन घेऊन तहानभूक विसरून जाऊन विद्यार्थ्यांनी निसर्ग संपन्न परिसराचा मनमुराद आनंद घेतला. काशविंडा बीचवर प्रेक्षणीय सागरी किनार्‍यावर विविध खेळ मनसोक्त खेळले.

टाईम्स स्पेशल

विद्यार्थी पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन कृतीशीलतेने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडल्याने व नाविन्यपूर्ण अनुभवाने विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरील आनंद ओसंडून वाहत होता. क्षेत्रभेट यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक डॉ. मनोज पाटील, उपक्रमाचे समन्वयक अफसाना मुल्ला, पदवीधर शिक्षक निलेश पाटील, धन्वंतरी मोरे, सुषमा गायकवाड यांनी प्रयत्न केले. तसेच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिल्पा कोळथरकर, उपाध्यक्ष रवींद्र जांभारकर, देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुधाकर कांबळे संतोष घुमे यांचे सहकार्य लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg