loader
Breaking News
Breaking News
Foto

राजापूर अर्बन बँक रत्नागिरी शाखेच्या तत्कालीन शाखाधिकारी विरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी - गेल्या दोन वर्षांपासून रत्नागिरीच्या सहकार चळवळीत खळबळ उडवून देणार्‍या राजापूर अर्बन बँकेच्या रत्नागिरी शाखेतील प्रकाराबाबत आता मोठा उलगडा झाला आहे. तत्कालीन शाखाधिकारी संतोष शरद नारकर यांनी राजापूर अर्बन बँकेच्या रत्नागिरी शाखेचा कारभार पाहताना बँकेने विश्‍वासाने सोपविलेल्या व नेमलेल्या शाखाधिकारी या पदाचा गैरवापर केला. बँकेचा विश्‍वासघात करुन ३९ बनावट कर्जप्रकरणे तयार करुन ती बँक शाखेतून वितरीत केली. या कर्जप्रकरणाची रक्कम १ कोटी ९८ लाख ६९ हजार ६७३ इतकी होती. सदर पैशाचा स्वतःचे फायद्याकरीता त्यांनी वापर करुन बँकेची फसवणूक केल्याची फिर्याद शेखरकुमार उत्तम अहिरे, राजापूर यांनी पोलिसात दिल्यावरुन रत्नागिरी शहर पोलिस स्थानक येथून संतोष नारकर यांच्याविरुद्ध गुन्हा र.जि.नं.१४/२०२६ भा.न्या.सं. २०२३चे कलम ३१६(२), ३१६ (५), ३१८ (४), ३३६ (२), ३३८प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg