loader
Breaking News
Breaking News
Foto

पर्यावरण वाचविण्यासाठी कोलझर ग्रामस्थांचा एल्गार

दोडामार्ग (प्रतिनिधी) - इको सेन्सिटिव्ह एरियामध्ये समाविष्ट असलेल्या कोलझर येथील पर्यावरण वाचवण्यासाठी गावाने दिल्ली लॉबीविरुद्ध एल्गार पुकारला. यासाठी सगळ्या गावाने एकत्र येत गावच्या जमिनी विकायच्या नाही आणि असा प्रयत्न करणार्‍यांना एकजुटीने कायदेशीर मार्गाने धडा शिकवायचा निश्चय केला. यावेळी उपस्थितात तरुणांची संख्या लक्षवेधी होती. वनशक्ती संस्थेने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील निर्णयानुसार केंद्राने अधिसूचना काढून कोलझर हे गाव इकोसेन्सिटीव्ह एरिया म्हणून जाहीर केले आहे. येथे पर्यावरणाला बाधा येईल, असे कोणतेही कृत्य करण्यास मनाई आहे. याशिवाय येथे २०१८ पासून वृक्षतोड बंदी आदेश लागू आहे. असे असूनही गेल्या आठवड्यात काही ‘दिल्ली लॉबी’शी संबंधित लोकांनी स्थानिक जमिन मालकांना तसेच ग्रामस्थांना अंधारात ठेवून मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या ख्रिश्चनवाडीपासून पुढच्या भागात घनदाट जंगलापर्यत अवैधरित्या खनिजयुक्त मातीचे उत्खनन केले आहे. ख्रिश्चनवाडीपासून पलिकडच्या गावातील (शिरवल) न्हयखोलपर्यत सुमारे ४ किलोमीटर लांबीचे आणि सुमारे १२ फूट रुंदीचे रस्तासदृश्य उत्खनन केले आहे. या प्रकाराने गावात खळबळ उडाली. या गावाने यापूर्वी खनिज उत्खननाचे वारे असतानाही आपल्या जमिनी दिल्या नव्हत्या. थेट झालेल्या अतिक्रमणाविरोधात लढा पुकारण्यासाठी गाव एकवटला. यासाठी गावच्या मंदिरात बैठक झाली. यावेळी देवस्थान मानकरी, स्थानिक याबरोबरच तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg