loader
Breaking News
Breaking News
Foto

वारकरी संप्रदायाची कास धरल्यास सदाचार व नीतीमूल्यांची जोड मिळते : अजयकुमार सर्वगोड

कणकवली (प्रतिनिधी) - कोणताही संत, ज्ञानी पुरुष हा विकारांवर नियंत्रण मिळवू शकत नाही. वारकरी संप्रदायाच्या विचारांमधून आपल्यावर संस्कार व्हायला हवेत. तरच नीती मूल्य जोपासली जाऊ शकतात. व यातूनच विकारांवर विचाराचे नियंत्रण येते. नीतीमूल्याचे पालन होत नसल्यामुळे सर्व क्षेत्रांमध्ये आता अध:पतन होऊ लागले आहे. व यातून बाहेर पडण्यासाठी वारकरी संप्रदायाची कास सर्वांनी धरण्याची गरज आहे. वारकरी संप्रदायाची कास धरल्यास आपसूकच या सर्व गोष्टी एकत्र येत आत्मिक समाधान मिळणार आहे. असे प्रतिपादन सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता व मूळ पंढरपुर येथील असलेले अजयकुमार सर्वगोड यांनी केले. कणकवली तालुक्यातील साकेडी येथील वाळकेश्वर नवतरुण प्रासादिक भजन मंडळच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वारकरी दिंडी भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सर्वगोड बोलत होते. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पावणादेवी वारकरी दिंडी भजन मंडळ किंजवडे, द्वितीय गणेश वारकारी भजन मंडळ, त्रिंबक, उत्कृष्ट गायक - बुवा विशाल राणे, सद्गुरू वारकरी दिंडी भजन मंडळ, कुडाळ, उत्कृष्ट वादक - नितीन घागरे श्री गणेश वारकारी भजन मंडळ, त्रिंबक यांना गौरविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी कणकवलीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर, सरपंच सुरेश साटम, वारकरी संप्रदाय जिल्हाध्यक्ष ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर, खजिनदार प्रभुगावकर, सिंधुदुर्ग जिल्हा भजन संस्था उपाध्यक्ष प्रकाश पारकर, बुवा ज्ञानदेव मेस्त्री, सचिव गोपीनाथ लाड, अशोक करंबेळकर, संदीप राणे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल हळदिवे, माजी सभापती संजय शिरसाट, निवेदक राजा सामंत, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर वालावलकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष साकेडी मुरारी राणे, तंटामुक्त समिती अध्यक्ष कासार्डे प्रकाश तिर्लोटकर, चित्रकार स्वप्नील पाटणकर, शामसुदर राणे, लक्ष्मण राणे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजू सदवडेकर, दिनेश गोगटे, जयप्रकाश मेस्त्री, बुवा रविकांत मेस्त्री, कणकवली तालुका भजन संस्था खजिनदार सुदर्शन फोपे, सचिव गणपत घाडीगावकर, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अर्जुन राणे, पुंडलिक निकम आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

याप्रसंगी बोलताना अजयकुमार सर्वगोड पुढे म्हणाले, वारकरी भजन स्पर्धांच्या माध्यमातून समाजात माणसे घडवण्याचे काम हे मंडळ करत आहे. असे सर्वगोड यांनी सांगितले. नगराध्यक्ष संदेश पारकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याला सांस्कृतिक, धार्मिक परंपरेचा एक मोठा वारसा आहे. समाजामध्ये एक चांगले वातावरण निर्माण करण्याचे काम अशा स्पर्धांच्या माध्यमातून होते. येणारी पुढची अनेक वर्षे ही स्पर्धा अशा जोराने सुरू ठेवा अशा शुभेच्छा पारकर यांनी दिल्या. आज व्यासपीठावर सर्व क्षेत्रातील मंडळी एकत्र आणण्याचे काम या मंडळाने केले ही ताकद ही भक्तीमध्ये आहे. यावेळी अशोक करंबेळकर, गणेश जेठे, बुवा गोपीनाथ लाड, अनिल हळदीवे, बुवा प्रकाश पारकर, अर्जुन राणे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी चित्रकला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी उत्कृष्ट चित्रकार म्हणून जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात ओळख असलेल्या व मूकबधिर असून देखील चित्रकला जोपासत आपल्या कलेची छाप जनमानसावर उमटवणार्‍या चित्रकार स्वप्नील पाटणकर यांचा सत्कार अजयकुमार सर्वगोड व संदेश पारकर यांच्या हस्ते करण्यात आला. साकेडी मधील जॅक्सन म्हापसेकर यांची महावितरण वायरमन पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक राजा सामंत यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg