loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जिल्हास्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेत पाटपन्हाळे हायस्कूल प्रथम

वरवेली (वार्ताहर) - ग्रंथाली प्रतिभांगण, माध्यमिक शिक्षण विभाग रत्नागिरी व रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान दिनानिमित्त संपन्न झालेल्या रत्नागिरी जिल्हास्तरीय विज्ञानधारा एकांकिका स्पर्धेत गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाने प्रथम क्रमांक संपादन केल्याबद्दल आकर्षक चषक, रोख पाच हजार रुपये व पाच हजार रुपये किंमतीची पुस्तके या स्वरूपात बक्षीस देऊन गौरविण्यात आले. विज्ञान दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हास्तरीय विज्ञानधारा विज्ञान एकांकिका स्पर्धा ख्रिस्त ज्योती कॉन्व्हेंट स्कूल वालोपे तालुका चिपळूण या ठिकाणी नुकतीच संपन्न झाली. सदर शैक्षणिक उपक्रमासाठी मान्यवर म्हणून रत्नागिरी जि.प.माध्यमिक शिक्षणाधिकारी दिपक मेंगाने, चिपळूण पंचायत समितीचे शिगवण, देसाई, रत्नागिरी विज्ञान मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुदेश कदम, कार्यवाह सुभाष सोकासने, बनगर, शिवाजी पाटील, चिपळूण तालुका विज्ञान मंडळ अध्यक्ष शैलेश सुर्वे आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदरच्या जिल्हास्तरीय विज्ञानधारा विज्ञान एकांकिका स्पर्धेत गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाने "कचरा व कचरा स्त्रोत " या विषयावर नाट्यातून विज्ञानाकडे ही एकांकिका सादर करून जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक संपादन केला. पाटपन्हाळे विद्यालयातर्फे शमिका सुमंत भिडे, नेहा संदीप निवाते, ओजस्वी सुधीर वासनिक, कस्तुरी समीर वझे, सावनी विक्रांत दिक्षित, शार्दुल भूषण ओक, मिहिर समिर पुरोहित या विद्यार्थ्यांनी एकांकिकेत सहभाग नोंदवून सादरीकरण करून सुयश पटकावले. पाटपन्हाळे विद्यालयाने प्रथम क्रमांक संपादन केल्याबद्दल आकर्षक चषक, पाच हजार रुपये रोख व पाच हजार रुपये किंमतीची पुस्तके या स्वरूपात विद्यार्थी व विद्यालयाचा गौरव करण्यात आला. रत्नागिरी जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून विज्ञान भवन मुंबई येथे विज्ञान एकांकिका स्पर्धेत एकांकिका सादरीकरणाची संधी पाटपन्हाळे विद्यालयाला लाभणार आहे.

टाइम्स स्पेशल

पाटपन्हाळे विद्यालयातील जिल्हास्तरीय एकांकिका स्पर्धेतील सुयशस्वी विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सुयशस्वी विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक के .डी.शिवणकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.वाय.भिडे तसेच शशिकांत महाजन आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. पाटपन्हाळे विद्यालयाने जिल्हास्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेत प्रथम क्रमांक संपादन केल्याबद्दल पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ, सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी, मुख्याध्यापिका एस.एस.चव्हाण, माध्यमिक शिक्षणाधिकारी, रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg